वाचा | कधीपर्यत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न

वाचा | कधीपर्यत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न



केंद्राकडून यापूर्वीच आर्थिक वर्ष २०१९-२० साठी आयटीआर भरण्याची तारीख ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्राने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदतही एक वर्षासाठी म्हणजेच ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली आहे.इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत एक महिन्याने वाढवण्यात येत असल्याची घोषणा केंद्र शासनाने बुधवारी केली. कर भरणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०१८-१९साठी आयटीआर भरण्याची नवी तारीख आता ३१ जुलै २०२० असणार आहे. 

१) आर्थिक वर्ष २०१८-१९ (मूल्यांकन वर्ष २०१९-२०) साठी मूळ तसेच सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ जुलै, २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

२) आर्थिक वर्ष २०१९-२०२० (मूल्यांकन वर्ष २०२०-२१) साठी प्राप्तिकर परताव्याची मुदत तारीख ३० नोव्हेंबर, २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ३१ जुलै २०२० आणि ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत भरलेल्या उत्पन्नाचा परतावा ३० नोव्हेंबर, २०२० पर्यंत भरता येईल. यामुळे टॅक्स ऑडिट अहवाल देण्याची तारीखही ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

त्याचबरोबर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने  अधिसूचनेद्वारे विविध गुंतवणूकी आणि आय-टी कायद्यांतर्गत कपात करण्याचा दावा करण्याची मर्यादादेखील एक महिन्यासाठी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com