वाचा ! ठाकरे कुटुंबाकडे किती संपत्ती ??  

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 12 मे 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे जवळपास १२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ठाकरे कुटुंबाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असली तरीही खुद्द उद्धव ठाकरे यांच्या मालकीचे एकही वाहन नाही. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्नी रश्मी तसेच आदित्य व तेजस या पुत्रांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रही दिले आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची एकत्रित चल-अचल संपत्ती अंदाजे १२५ कोटी रुपये आहे. त्यात त्यांच्या तीन बंगल्यांचाही समावेश आहे. यातील 'मातोश्री' हा बंगला वांद्रे पूर्व येथील कलानगर येथे असून, त्याच्याच समोर नवीन बंगला उभारण्यात येत आहे. तसेच कर्जत येथे ठाकरे यांचे फार्म हाऊसही आहे. ठाकरे यांच्या उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असून, यामध्ये विविध कंपन्यांमधील भागीदारी आणि त्यातून मिळणारा लाभांश याचाही समावेश आहे. आत्तापर्यंत ठाकरे यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात २३ प्रकरणांची नोंद असून, त्यातील १२ प्रकरणे बंद करण्यात आली आहेत. उर्वरित तक्रारींची खासगी तक्रार म्हणून नोंद करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ११ कोटी ३८ लाख रु.च्या आसपास संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाख रु.च्या बँक ठेवी, २० लाख ३९ हजार रु.चे बाँड शेअर, बीएमडब्ल्यू कार (६ लाख ५० हजार रु.), ६४ लाख ६५ हजार रु.चे दागिने तसेच १० लाख २२ हजार अशी रक्कम होती. आदित्य यांची स्थावर मालमत्ता ४ कोटी ६७ लाख आणि गुंतवणूक ११ कोटी ३८ लाख असून एकूण १६ कोटी ५ लाख ५ हजार २५८ रुपये ही त्यांची जाहीर केलेली मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. 

सोमवारी दाखल केलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात उद्धव यांनी आपल्या तसेच पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेल्या संपत्तीची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे जवळपास १२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ठाकरे कुटुंबाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असली तरीही खुद्द उद्धव ठाकरे यांच्या मालकीचे एकही वाहन नाही. 

 

WebTittle :: Read on! How much wealth does Thackeray family have?


  


संबंधित बातम्या

Saam TV Live