वाचा | राज्यात 'या' दिवसापर्यत वाढवला लॉकडाऊन 

वाचा | राज्यात 'या' दिवसापर्यत वाढवला लॉकडाऊन 


मुंबई : राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सलग तीन दिवस दीड हजाराच्या पुढे रुग्ण सापडल्याने कोरोना संकट अधिकच गंभीर बनले आहे.  पुणे, राज्यात 3 लाख 34 हजार 558 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शनिवारी आणखी 67 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 22 मृत्यू हे गेल्या 24 तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत.  राज्यात कोरोना संकट गंभीर झाले आहे. ठाणे, नवी मुंबई, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर येथील आकडे झपाट्याने  वाढत आहेत.  त्यामुळे लॉकडाऊन वाढणार हे निश्चित होते. राज्यात रुग्णसंख्येनुसार चार झोन करण्यात आले आहेत. त्यामुळे रेड आणि कटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध कडक होतील अशी शक्यता आहे, तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये निर्बंद शिथिल करून उद्योगांना चालना दिली जाईल अशी शक्यता आहे. 
 
मुंबईत शनिवारी आणखी 884 रुग्ण सापडल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 18,396 वर पोहोचली आहे. राज्यातही 1606 नव्या रुग्णांची भर पडल्याने महाराष्ट्राची एकूण रुग्णसंख्या 30,035 झाली आहे. 9 मार्च ते 16 मे म्हणजे दोन महिने 6 दिवसांत रुग्ण संख्येने हा तीस हजारांचा टप्पा पार केला.  मुंबईत आतापर्यंत 696 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शनिवारी 24 तासांत 41 बळी गेले. मृत्यू पावलेल्या या रुग्णांपैकी 27 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला. तर 14 जणांचा बळी 7 ते 12 मे या कालावधीत झाला.  जूनमध्ये मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट वाढण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच व्यक्त केल्यामुळे इथून पुढचा काळ हा वाढत्या रुग्णसंख्येचा असण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार मुंबईत ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर्स, विलगीकरण केंद्रे आणि कोरोना दवाखाने उभारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. 

WebTittle :: Read | Lockdown extended to 'this' day in the state


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com