वाचा | राज्यात लॉज, गेस्ट हाऊसना परवानगी,पण काय आहेत नियम

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 7 जुलै 2020

हॉटेले सुरू करण्यास लवकरच परवानगी देण्यात येईल, असे सांगितले होते. मुख्य सचिव संजय कुमार यांनी सोमवारी याबाबतचा आदेश काढला. त्यानुसार सरकारने 'मिशन बिगीन अगेन'च्या चौथ्या टप्प्यात लॉज, गेस्ट हाऊसला मान्यता दिली आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील हॉटेले आणि लॉज सुरू करता येणार नाहीत, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी हॉटेले सुरू करण्यास लवकरच परवानगी देण्यात येईल, असे सांगितले होते. मुख्य सचिव संजय कुमार यांनी सोमवारी याबाबतचा आदेश काढला. त्यानुसार सरकारने 'मिशन बिगीन अगेन'च्या चौथ्या टप्प्यात लॉज, गेस्ट हाऊसला मान्यता दिली आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील हॉटेले आणि लॉज सुरू करता येणार नाहीत, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

करोनाच्या संदर्भात उपाययोजनांची माहिती देणारे फलक, पोस्टर दर्शनी भागात लावावेत, हॉटेल आणि पार्किंगसारख्या भागात गर्दीचे योग्य नियोजन करावे. रांगा किंवा आसन व्यवस्थेत सुरक्षित वावरसाठी वर्तुळे आखावीत, अशा अटी हॉटेले व लॉजसाठी घालण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक राहील. रिसेप्शन टेबलजवळ संरक्षक काच बसविणे आवश्यक असेल. लहान मुलांसाठी असलेल्या जागेचा वापर करता येणार नाही. तरण तलाव, जिम बंदच राहणार आहेत. पायाने वापरता येणारी हँड सॅनिटायझर मशीन ही रिसेप्शन, गेस्टरुम, लॉबी इथे मोफत उपलब्ध करावीत, अशीही अट आहे. फेसमास्क, फेस कव्हर, ग्लोव्हज या गोष्टी हॉटेल कर्मचारी आणि ग्राहकांना उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. चेक इन आणि चेक आऊट करण्यासाठी क्यूआर कोड, ऑनलाइन फॉर्म, डिजिटल पेमेंट, ई-वॉलेट अशी विनासंपर्कात येणारी प्रणाली वापरावी, असेही सांगण्यात आले आहे.

-करोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश

-मास्कविना प्रवेश नाही

-हॉटेलमध्ये असताना संपूर्ण वेळ मास्क घालणे आवश्यक.

-प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय स्थितीची माहिती आणि ओळखपत्र रिसेप्शनवर देणे बंधनकारक.

सध्या जी हॉटेले, लॉज, गेस्ट हाऊस विलगीकरण केंद्र म्हणून वापरात आहेत, त्यांचा वापर महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत विलगीकरण केंद्र म्हणूनच केला जाईल. किंवा त्यांचा उर्वरित भाग (६७ टक्के) महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून विलगीकरण केंद्र म्हणून वापरला जाऊ शकतो, असेही आदेशात म्हटले आहे.सुरक्षित वावरचे नियम पाळून लिफ्टमधील व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवावी, सर्व एअर कंडीशनचे तापमान ३४ ते ४० अंश सेल्सिअस या मर्यादेत असावे. हवा खेळती राहावी यासाठी क्रॉस व्हेंटिलेशन उत्तम असावे, असेही बजावण्यात आले आहे.

 

WebTittle :: Read | Lodges in the state, guest houses allowed, but what are the rules


  


संबंधित बातम्या

Saam TV Live