वाचा | उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार

वाचा | उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटद्वारे आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियान या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन केले. आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात ५ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. या बरोबरच ५० लाख कामगारांना लघु तसेच मोठ्या उद्योगांमध्ये सामावून घेतले जाणार आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात विविध राज्यांमधून परत आलेल्या ३० लाख ४३ हजार स्थलांतरित मजुरांची कौशल्य चाचणी घेण्यात आली असून हे सर्व मजूर २४ लाख ७५ हजार कृषी कार्य, तसेच बांधकाम कार्याशी जोडले गेले होते, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील ३१ जिल्ह्यांमध्येच २५ हजारांहून अधिक स्थलांतरित मजूर परतले आहे. विशेषत: या अभियानांतर्गत या ३१ जिल्ह्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या स्वावलंबी यूपी रोजगार अभियानाचे ऑनलाइन उद्घाटन केले. या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या अभियानांतर्गत स्थलांतरित मजुरांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून या सोबतच या अभियानामुळे स्थानिक उद्योगांनाही चालना मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधानांनी पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ झालेल्या कुटुंबाशी संवाद साधला. या वेळी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या, असा सल्ला दिला. यावेळी देशातील विविध शहरांमधून लॉकडाउनमुळे परतलेल्या अनेक लोकांशी मोदींनी संवाद साधला. याबरोबरच त्यांनी उत्तर प्रदेशात येऊन नव्या रोजगाराची कशी कास धरली आणि सरकारी योजनांचा कसा लाभ घेतला याबाबच चर्चा केली.आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील लाभार्त्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोंडा येथून स्वयं सहायता समूहाच्या महिलांशी संवाद साधला. त्यावेळी तुम्ही महिलांनी आपल्या गावातील १० कुटुंबांना स्वावलंबी बनवल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. 

WebTittle ::Read | Modi inaugurated the program online


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com