सविस्तर वाचा ! राज्यात कोरोनाचे किती रूग्ण  

साम टीव्ही न्यूज
रविवार, 17 मे 2020


राज्यात 3 लाख 34 हजार 558 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शनिवारी आणखी 67 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 22 मृत्यू हे गेल्या 24 तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत.

मुंबई : मुंबईत आतापर्यंत 696 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. शनिवारी 24 तासांत 41 बळी गेले. मृत्यू पावलेल्या या रुग्णांपैकी 27 जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला. तर 14 जणांचा बळी 7 ते 12 मे या कालावधीत झाला. जूनमध्ये मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट वाढण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच व्यक्त केल्यामुळे इथून पुढचा काळ हा वाढत्या रुग्णसंख्येचा असण्याची चिन्हे  आहेत. त्यानुसार मुंबईत ठिकठिकाणी कोरोना केअर सेंटर्स, विलगीकरण केंद्रे आणि कोरोना दवाखाने उभारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. 

राज्यात 3 लाख 34 हजार 558 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात शनिवारी आणखी 67 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 22 मृत्यू हे गेल्या 24 तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीतील आहेत.  राज्यात सलग तीन दिवस दीड हजाराच्या पुढे रुग्ण सापडल्याने कोरोना संकट अधिकच गंभीर बनले आहे.  पुणे, ठाणे, नवी मुंबई, मालेगाव, औरंगाबाद, सोलापूर येथील आकडे झपाट्याने वाढत आहेत. मुंबईत शनिवारी आणखी 884 रुग्ण  सापडल्यामुळे एकूण रुग्णसंख्या 18,396 वर पोहोचली आहे. राज्यातही 1606 नव्या रुग्णांची भर पडल्याने महाराष्ट्राची एकूण रुग्णसंख्या 30,035 झाली आहे. 9 मार्च ते 16 मे म्हणजे दोन महिने 6 दिवसांत रुग्ण संख्येने हा तीस हजारांचा टप्पा पार केला. 

WebTittle :: Read more! How many corona patients in the state


संबंधित बातम्या

Saam TV Live