सविस्तर वाचा ! CBSE दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक यादिवशी जाहीर होणार

साम टीव्ही न्यूज
रविवार, 17 मे 2020

वेळापत्रक आज अखेर जारी होणार होतं. त्याबाबत शनिवारी सकाळीच केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिल्याने लाखो विद्यार्थी आणि पालक या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत होते. पण या सर्वांना आता सोमवार १८ मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी सीबीएसईने जाहीर केले होते की दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा १ ते १५ जुलै २०२० दरम्यान घेण्यात येतील. दहावीची परीक्षा फक्त ईशान्य दिल्लीतील विद्यार्थ्यांसाठी असेल तर १२ वी च्या उर्वरित परीक्षा देशभरात घेण्यात येणार आहेत. एकूण प्रलंबित परीक्षांपैकी २९ मुख्य विषयांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.वेळापत्रकाला अंतिम स्वरुप देण्यापूर्वी काही आणखी अतिरिक्त तांत्रिक बाबींकडे लक्ष दिलं जात आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाचं दहावी आणि बारावीचं वेळापत्रक आज १६ मे रोजी जाहीर होणार नाही, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक आज १६ मे रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर केले जाणार होते. पण ते आता सोमवारी १८ मे रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली आहे.या परीक्षा १ ते १५ जुलै २०२० या दरम्यान होणार हे नक्की असलं तरी त्यांचं सविस्तर वेळापत्रक बोर्डाने अद्याप जारी केलेलं नाही. हे वेळापत्रक आज अखेर जारी होणार होतं. त्याबाबत शनिवारी सकाळीच केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिल्याने लाखो विद्यार्थी आणि पालक या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत होते. पण या सर्वांना आता सोमवार १८ मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. वेळापत्रक शनिवारी जाहीर होईल अशी घोषणा करूनही ते जाहीर करता न आल्याने विद्यार्थी-पालकांची गैरसोय झाल्याबद्दल पोखरियाल यांनी दिलगीरीदेखील व्यक्त केली.

WebTittle :: Read more! The schedule of CBSE 10th and 12th examinations will be announced on the list

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live