वाचा | कोरोना रूग्णांचा नवा विक्रम

साम टीव्ही न्यूज
रविवार, 14 जून 2020

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाच्या लक्षणांमध्ये आणखी दोन लक्षणांचा समावेश केला आहे. अचानक वास व चव या दोन संवेदना नाहीशा झाल्या असतील तर व्यक्तीला करोनाची बाधा झालेली असू शकते. ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे वा दुखणे, थकवा येणे, नाक गळणे, अंगदुखी, पोट बिघडणे आदी करोनाची लक्षणे मानली जातात.

 

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात करोना रुग्णांची संख्या ३ लाख २० हजार ९२२ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ९ हजार १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. एक लाख ४९ हजार ३४८ जणांनावर उपचार सुरु आहेत. एक लाख ६२ हजार ३७९ जणांनी करोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधिन रुग्णांपेक्षा जास्त आहे. असे असले तरी करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत ५५ लाख ७ हजार १८२ नमुना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.एका दिवसात सर्वाधिक नव्या रुग्णांची भर पडली असून गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ९२९ नवे रुग्ण आढळले आहेत. भारत आता करोनाचा फटका बसलेल्या जगभरातील देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. सिक्कीम, लडाखसारख्या या ईशान्येकडील भागांमध्येही करोनाचा प्रदुर्भाव वाढू लागला आहे.
देशात दिवसागणिक करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रलयाने दिलेल्या माहितीनुसार, सलग चौथ्या दिवशी तीनशेहून अधिक मृत्यू झाले आहेत. मागील २४ तासांत देशात ३११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. 

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोनाच्या लक्षणांमध्ये आणखी दोन लक्षणांचा समावेश केला आहे. अचानक वास व चव या दोन संवेदना नाहीशा झाल्या असतील तर व्यक्तीला करोनाची बाधा झालेली असू शकते. ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे वा दुखणे, थकवा येणे, नाक गळणे, अंगदुखी, पोट बिघडणे आदी करोनाची लक्षणे मानली जातात.अजूनही महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात या चार राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. महाराष्ट्राने १ लाखाचा आकडा पार केला आहे तर, दिल्लीमध्ये ३६ हजारून अधिक रुग्णांनी नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये २१३७ रुग्णांची वाढ झाली. एकूण मृत्यूही १,२१४ झाले आहेत.

WebTittle ::Read | New record for corona patients


संबंधित बातम्या

Saam TV Live