वाचा | आता हा देश ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 22 जून 2020

ब्राझिलमधील वाढत्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुले राष्ट्रपती जायर बोलसोनारो यांच्यावर टीका होत आहे. बोलसोनारो यांनी देशात सोशल डिस्टन्सिंगसारखे उपाय राबवलं नाहीत. राष्ट्रपतीच्या मते त्यामुळे रोजगार संपुष्टात येतो.

गेल्या २४ तासांत ब्राझिलमध्ये ३४ हजार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख ९० हजार झाली आहे. ब्राझिलच्याआधी सर्वाधिक मृत्यू अमेरिेकेत झाले आहेत. अमेरिकेत एक लाख २२ हजार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये सर्वाधिक करोना महामारीचा प्रादुर्भाव झाला आहे. मागील २४ तासांत ब्राझिलमध्ये १०२२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमध्ये आतापर्यंत ५० हजार ६२९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझिलमधील वाढत्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुले राष्ट्रपती जायर बोलसोनारो यांच्यावर टीका होत आहे. बोलसोनारो यांनी देशात सोशल डिस्टन्सिंगसारखे उपाय राबवलं नाहीत. राष्ट्रपतीच्या मते त्यामुळे रोजगार संपुष्टात येतो.

जगाला लागलेलं करोना व्हायरसचं ग्रहण सुटायचं नाव घेईना. अमेरिकेनंतर आणखी एका देशात करोनाच्या मृत्यूचा तांडव सुरू आहे. अमेरिकेत करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या एक लाखांच्यापुढे गेली आहे. अमेरिकेनंतर ब्राझिलची परिस्थिती चिंताजनक आहे. ब्राझिलमध्ये करोनाचं थैमान अजूनही कमी झालेलं नाही. एएफपीनं दिलेल्या वृत्तानुसार, ब्राझिलमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live