वाचा | आता गुगल करणार ऑटोमॅटिकली डेटा डिलीट

वाचा | आता  गुगल करणार ऑटोमॅटिकली डेटा डिलीट


जगातील आघाडीची टेक कंपनी Google ने आपल्या ‘प्रायव्हसी पॉलिसी’मध्ये  बदल केला आहे. नव्या सेटिंग्सअंतर्गत आता गुगल तुमची सर्च आणि लोकेशन हिस्ट्री तसेच व्हॉइस कमांड्सचा डेटा 18 महिन्यांनंतर ऑटोमॅटिकली डिलीट करेल. हे फीचर आधीपासून उपलब्ध होतं, पण त्यासाठी युजर्सना सेटिंग्समध्ये जाऊन हे फीचर ऑन करावं लागायचं. पण आता नव्या युजर्ससाठी हे फीचर ‘डिफॉल्ट’ असणार आहे.

-स्मार्टफोनमध्ये गुगल अ‍ॅप ओपन करुन उजव्या बाजूला असलेल्या Profile पर्यायवर टॅप करा
-Manage you Google Account वर टॅप करुन Data & Personalization मध्ये जा
-इथे तुम्हाला Acticvity Controls च्या खाली Web & App Activity पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
-आता खाली दिलेल्या Auto Delete पर्यायावर जा
-इथे 3 महीने, 18 महीने आणि Off असे तीन पर्याय दिसतील, तुम्हाला पाहिजे तो पर्याय निवडा.

जर तुम्हालाही तुमची सर्च किंवा लोकेशन हिस्ट्री आणि व्हॉइस कमांड्स गुगलद्वारे आपोआप डिलीट करायची असेल, तर तुम्हाला सेटिंग्समध्ये खालील बदल करावे लागतील.नवीन ‘प्रायव्हसी सेटिंग्स’ गुगल अ‍ॅप आणि वेबसाठी आहेत. याशिवाय हे फीचर कंपनीने युट्यूबसाठीही आणलं आहे. युट्यूबवर ऑटो-डिलीटचं फीचर आधी 36 महिन्यांनंतर होतं. गुगलने गेल्या वर्षी 3 महीने किंवा 18 महिन्यांनंतर ऑटोमॅटिकली डिलीटचं फीचर आणलं होतं. त्यासाठी युजर्सना Settings मध्ये जावून हे फीचर ऑन करावं लागतं.

Read | Now Google will automatically delete the data

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com