वाचा | आता कोरोनावर आलं औषध

साम टीव्ही न्यूज
रविवार, 21 जून 2020

करोनाचा प्रभाव वाढत असताना ग्लेनमार्क या कंपनीने करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर हे औषध प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध समोर आणलं आहे. ग्लेनमार्कच्या या औषधाला सीडीएससीओने फेविपिरावीर फेबीफ्लू च्या उत्पादन आणि वितरणाला मंजुरी दिली आहे.

भारतीय औषध महानियंत्रक संस्थेकडून म्हणजेच DCGI या संस्थेकडून या औषधाच्या उत्पादन आणि वितरणाला संमती देण्यात आली असल्याचे मुंबईतील कंपनीने सांगितले. करोना संसर्गावर अशा प्रकारे मंजुरी मिळालेले हे पहिलेच औषध आहे. लाइव्हमिंटने या संदर्भातले वृत्त दिले आहे.करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर औषध अखेर भारतात उपलब्ध झालं आहे. औषध तयार करणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीने यासंदर्भातला दावा केला आहे. या औषधाला सरकारतर्फे मंजुरीही मिळाली आहे. करोनाची सौम्य लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांना हे औषध दिलं जाऊ शकतं. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध समोर आणलं आहे. ग्लेनमार्कच्या या औषधाला सीडीएससीओने फेविपिरावीर फेबीफ्लू च्या उत्पादन आणि वितरणाला मंजुरी दिली आहे.

 करोनाचा प्रभाव वाढत असताना ग्लेनमार्क या कंपनीने करोनावर प्रभावी ठरणारं फेविपिरावीर हे औषध प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने फेविपिरावीर फेबीफ्लू ब्रांडच्या नावाने हे औषध समोर आणलं आहे. ग्लेनमार्कच्या या औषधाला सीडीएससीओने फेविपिरावीर फेबीफ्लू च्या उत्पादन आणि वितरणाला मंजुरी दिली आहे.
 

औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध होणार असल्याचे या कंपनीने सांगितले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे औषधाच्या एका गोळीची किंमत १०३ रुपये आहे. या औषधाचे पहिल्या दिवशी १८०० मिलिग्रॅमचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. तर १४ दिवसांपर्यंत ८०० मिलिग्रॅमचे दोन डोस रोज घ्यायचे आहेत.करोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात वाढला आहे. शुक्रवारपर्यंतच्या संख्येनुसार महाराष्ट्रात १ लाख २४ हजारांच्या वर रुग्णसंख्या आहे. मृत्यूंचंही प्रमाण वाढलं आहे. महाराष्ट्रात शुक्रवारच्या आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचा दर ५०.४९ टक्के आहे. तर शुक्रवारी राज्यात १९३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारपर्यंतच्या संख्येनुसार महाराष्ट्रात ६२ हजार ७०० च्या वर रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Read | Now the medicine came on the corona


संबंधित बातम्या

Saam TV Live