वाचा | आता 'ही' आहेत कोरोनाची लक्षणं

वाचा | आता 'ही' आहेत कोरोनाची लक्षणं


नवी दिल्ली : ताप, कोरडा खोकला, श्वासोच्छवासास अडथळा, थकवा, शरीरदुखी, डोकं दुखी, स्वाद किंवा गंधाची क्षमता नष्ट होणं आणि घश्यात त्रास अशी एकूण नऊ करोना संक्रमणाची लक्षणं जाहीर करण्यात आली होती. त्यात आता आणखीन तीन लक्षणंही जोडण्यात आली आहेत. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) नं या तीन लक्षणांचा करोनाची लक्षणं म्हणून समावेश केलाय. यामध्ये वाहतं नाक, उलटी आणि अतिसार यांचा समावेश आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सध्या त्यांना असेही काही रुग्ण आढळत आहेत ज्यांना अगोदर डायबेटीजचा त्रास नव्हता. परंतु, आता मात्र त्यांची शुगर लेव्हल अचानक ४०० चा टप्पा सहज पार करते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, करोना रुग्णांमध्ये शुगर लेव्हल अचानक वाढत असल्याचं दिसून येतंय.

अगोदर कोरडा खोकला, ताप इत्यादी करोनाची लक्षणं समजली जात होती. परंतु, त्यात यात तब्बल ११ लक्षणांचा समावेश करण्यात आलाय. उल्लेखनीय म्हणजे, पाठीचं दुखणं हेदेखील करोनाचं लक्षण असू शकतं, असंही समोर येतंय.

करोना संक्रमणामुळे आत्तापर्यंत १७ हजार ४०० जणांनी आपले प्राण गमावलेत. देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ५ लाख ८५ हजार ४९३ वर पोहचलीय. यातील ३ लाख ४७ हजार ९७९ जण करोनामुक्त झालेत. तर अद्याप २ लाख २० हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईच्या सीनियर डॉक्टर जलील पारकर यांचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णावर उपचार करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास २०० रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यानंतर त्या स्वत: करोना पॉझिटिव्ह आढळल्या. जलील यांच्या म्हणण्यानुसार, पाठीचं दुखणं हे त्यांच्यात आढळलेलं पहिलं लक्षणं होतं.उल्लेखनीय म्हणजे, पाठीच्या दुखण्याची तक्रार घेऊन आलेले अनेक लोक टेस्टिंगमध्ये करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जर तुमची कंबर दुखतेय, पोटात दुखतंय किंवा पायाच्या पोटऱ्या दुखत असतील, तर ही करोनाची लक्षणंही असू शकतात,

WebTittle :: Read | Now these are the symptoms of corona

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com