वाचा | देशात कोरोनाची रूग्णसंख्या थांबेना

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 2 जुलै 2020

कोव्हीड-१९ इंडिया डॉट ओआरजीनुसार आज बुधवारी रात्रीपर्यंत करोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेली आहे. देशात करोनाचे एकूण ६, ०१, ९५२ रुग्ण आढळून आले. यापैकी ३,५७,६१२ जण करोनामुक्त झाले आहेत.

नवी दिल्लीः दिल्लीतील करोना रुग्णांची एकूण संख्याही ८९ हजारांवर गेली आहे. तर महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ५५३७ नवे रुग्ण आढळले आहेत.देशातील करोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत करोनाचे २४४२ रुग्ण आढळून आले आहेत.

कोव्हीड-१९ इंडिया डॉट ओआरजीनुसार आज बुधवारी रात्रीपर्यंत करोना रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेली आहे. देशात करोनाचे एकूण ६, ०१, ९५२ रुग्ण आढळून आले. यापैकी ३,५७,६१२ जण करोनामुक्त झाले आहेत. यापैकी १७, ७८५ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशात सध्या २,२६,४८९ जणांवर उपचार सुरू आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी १.८० लाखाहून अधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. यानंतर तामिळनाडू आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. या शिवाय हरयाणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये वेगाने करोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत.

राजधानी दिल्लीत २७,००७ जणांवर उपचार सुरू आहेत. १६, ७०३ जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.राजधानी दिल्लीत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत २,४४२ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे दिल्लीत करोना रुग्णांची संख्या ८९,८०२ इतकी झाली आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृतांची संख्या ही २८०३ वर गेली आहे. दिल्लीत आतापर्यंत एकूण ५९, ९९२ जण करोनामुक्त झाले आहेत.

देशात करोनाच्या रुग्णांची १ लाख संख्या होण्यासाठी ६४ दिवस लागले होते. तीन जूनला करोना रुग्णांची संख्या दोन लाखांवर होती. करोना रुग्णांची तीन लाख संख्या होण्यासाठी फक्त १० दिवस लागले तर चार लाख होण्यासाठी ८ दिवस लागले. त्यानंतर आता गेल्या पाच दिवसांत करोनाचे एक लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.

 

WebTittle :: Read | The number of corona patients in the country will not stop

 


संबंधित बातम्या

Saam TV Live