वाचा ! प्रवासी मजुरांसाठी पियुष गोयल यांची मोठी घोषणा  

वाचा ! प्रवासी मजुरांसाठी पियुष गोयल यांची मोठी घोषणा  

नवी दिल्लीः अडकलेल्या मजूर आणि कामगारांसाठी आता कुठल्याही जिल्ह्यातून श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यास रेल्वे तयार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अडकलेल्या मजुरांची यादी आणि त्यांच्या ठिकाणांची माहिती परवानगीसाठी राज्याच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे द्यावी, असं गोयल यांनी सांगितलं. यासोबतच रेल्वे राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांकडेही ही यादी सादर करावी, अशी सूचनाही गोयल यांनी केलीय.

आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, हरयाणा, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगण, कर्नाटक, केरळ, गोवा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमधून या राज्यांमधून श्रमिक विशेष ट्रेन या चालवण्यात आल्या आहेत. रेल्वेत चढण्यापूर्वी मजुरांचे स्क्रिनिंग केले जात असून त्यांना प्रवासादरम्यान मोफत जेवण आणि पाणी देण्यात येत आहे. अडकलेल्या मजुरांना पोहोचवण्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन सोडव्यात असं आवाहन गेल्या काही दिवसांपासून रेल्वे मंत्री पियुष गोयल आवाहन करत आहेत. खास करून पश्चिम बंगाल, राजस्थान आणि झारखंड या राज्यांसाठी गोयल हे आवाहन करत आहेत. दम्यान, रेल्वेने १५ मेपर्यंत १०४७ श्रमिक विशेष ट्रेन विविध राज्यांमधून चालवल्या आहेत. या विशेष ट्रेनद्वारे १४ लाख मजूर आणि कामगारांना त्यांच्या गावी सोडण्यात आलं आहे. १ मेपासून ते १५ मपर्यंतच्या कालावधीत एवढ्या मजुरांना विशेष ट्रेननं सोडलं गेलंय.

संबंधित अधिकाऱ्यांनी आणि यंत्रणांनी अडकून पडलेल्या मजुरांची यादी आणि त्यांना पोहोचवण्याचे ठिकाणाची यादी तयार करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत, असं गोयल यांनी सांगितलं.करोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे लाखो स्थलांतरीत मजूर अनेक राज्यात अडकून आहेत. अडकून पडलेल्या या मजुरांना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलासा दिला आहे. आता लवकरच सर्व जिल्ह्यांमधून श्रमिक विशेष ट्रेन चालवता येईल, असं गोयल म्हणाले. 

WebTittle :: Read on! Piyush Goyal's big announcement for migrant workers

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com