वाचा | राहूल गांधींचा मोदींवर आरोप 

वाचा | राहूल गांधींचा मोदींवर आरोप 

नवी दिल्ली : चीनच्या भारतीय सैन्यावरील हल्ल्य़ावरून पंतप्रधानांनी लडाखमधील परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी  विरोधी पक्षांनी लावून धरली होती. यानुसार शुक्रवारी मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यामध्ये देशाची एक इंचही जागा कोणाच्या ताब्यात गेलेली नाही, एकही पोस्ट चीनच्या ताब्यात गेलेली नाही, असे स्पष्ट केले होते. यावर राहुल गांधी यांनी आक्षेप घेत गंभीर आरोप केले आहेत.भारताची एकही इंच जमीन कोणाच्याही ताब्यात नाही तसेच कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

 विरोधी पक्षांसोबतच्या बैठकीमध्ये मोदी यांनी परिस्थिती स्पष्ट केली. पूर्व लडाखमधील गलवान खोºयामध्ये चीनशी झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर चीनविरोधात भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजिलेल्या व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करू नये. चीनने तसा प्रयत्न केल्यानंतर भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमेपलीकडून येणाºया आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराला योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार सरकारने दिले आहेत. त्याचबरोबर राजनैतिक पातळीवरून भारताने आपली ठाम भूमिका चीनच्या कानावर घातली आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी सर्व भारतीय कटिबद्ध आहेत हेच सर्वपक्षीय बैठकीतील चर्चेतून दिसून आले. भारताची कुरापत काढण्याचा कोणी विचारही करू नये असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. या बैठकीत बोलताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या की, ही बैठक याआधीच बोलवायला हवी होती. लडाखच्या सीमेवर चीनने कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे अशा बातम्या ५ मे रोजी आल्या होत्या. तेव्हाच ही बैठक व्हायला हवी होती.

चीनला तोडीस तोड उत्तर द्यायचे असे दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आयोजिलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमताने ठरविण्यात आले. या बैठकीला काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह वीस राजकीय पक्षांचे प्रमुख तसेच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे उपस्थित होते. गलवान खोऱ्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांना या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या आक्रमकतेपुढे झुकत स्वत:ला सरेंडर केले आहे. पंतप्रधानांचे म्हणणे असे असेल तर सोमवारी भारतीय जवान चीनच्या हद्दीत घुसलेले असा अर्थ निघतो. ज्या जागेवर भारतीय जवान शहीद झालेत, ती जागा चीनची होती का? आपल्या सैनिकांना का मारण्यात आले? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. 

WebTittle :: Read | Rahul Gandhi's allegations against Modi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com