वाचा| १०वी-१२वीची राहिलेली परीक्षा रद्द

वाचा| १०वी-१२वीची राहिलेली परीक्षा रद्द


नवी दिल्ली :कोरोनाची साथ कमी वाढत असल्याने परीक्षा घेऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्या होत्या. त्यावर न्या. अजय खानविलकर , न्या. दिनेश महेश्वरी व न्या. संजय खन्ना यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली, तेव्हा सीबीएसईच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मंडळाचा वरील निर्णय कळविला. आयसीएसईही याचेच अनुकरण करेल, असे ज्येष्ठ वकील जयदीप गुप्ता
यांनी सांगितले.

महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा या राज्यांनी परीक्षा घेऊ देण्यास नकार दिला. त्यामुळे जे विद्यार्थी सरकारी गुण न स्वीकारता प्रत्यक्ष परीक्षेचा पर्याय स्वीकारतील त्यांची परीक्षा केव्हा घ्यायची, याचा निर्णय राज्यांऐवजी केंद्र सरकारच घेईल, असेही सॉलिसिटर जनरलंनी खंडपीठाने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.आधीच्या तीन परीक्षांच्या आधारे विद्यार्थ्यांना किती गुण दिले गेले हे तसेच कामगिरी सुधारण्यासाठीची परीक्षा केव्हा होईल, हे १५ जुलैपूर्वी जाहीर केले जाईल. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सरासरी पद्धतीने दिलेले गुण ग्राह्य धरले जातील, असेही ते म्हणाले. दोन्ही मंडळांनी या बाबी प्रतिज्ञापत्राद्वारे शुक्रवारी सादर कराव्यात म्हणजे याचिकांवर आदेश देता येतील, असे खंडपीठाने सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची होत नसल्याने सीबीएसई व आयसीएसईने बारावीच्या राहिलेल्या विषयांची परीक्षा रद्द करण्याचे ठरविले आहे. कोरोनाचा फैलाव होण्याआधी ४० पैकी २९ विषयांची परीक्षा झाली होती. राहिलेल्या विषयांची परीक्षा १ ते १५ जुलै या काळात घेण्याचा विचार होता. परंतु आता परीक्षा घेतलीच जाणार नाही.
ज्यांना हे गुणांकन पसंत नसेल त्यांना चांगली कामगिरी करण्यासाठी आणखी एक परीक्षा देण्याची संधी मिळेल. ही परीक्षा परिस्थिती सामान्य झाल्यावरघेण्यात येईल. जे विद्यार्थी तो पर्याय स्वीकारतील, त्यांना त्या परीक्षेतील गुण अंतिम मानले जातील.बारावीच्या विद्यार्थ्यांना राहिलेल्या विषयांची परीक्षा देण्याची सक्ती असणार नाही. शाळांनी याच विषयाच्या आधी घेतलेल्या तीन परीक्षांमधील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेतही गुण दिले जातील.

WebTittle ::Read | Remaining 10th-12th exam canceled

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com