वाचा | लॉकडाऊननंतर तिरुपती देवस्थानात इतकं दान

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 11 जून 2020

20 मार्चपासून भाविकांसाठी बंद असलेल्या तिरुपती मंदिरात सामान्यपणे दर महिन्याला रोख आणि हुंडीद्वारे सुमारे 200 कोटी रुपयांचे दान मिळत असते.
पहिले दोन दिवस मंदिरात जवळपास 12 हजार भक्तांनी दर्शन घेतले.

भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुमला तिरुपती देवस्थान करोना व्हायरसच्या संकटामुळे 20 मार्चपासून बंद होते. सोमवारी हे मंदिर पहिल्यांदा उघडले आणि पहिल्याच दिवशी भाविकांनी तब्बल 25 लाख 70 हजार रुपये दान केले. पहिले दोन दिवस फक्त टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी मंदिर उघडण्यात आले होते. तर, तिसऱ्या दिवशी मंदिर स्थानिकांसाठी उघडण्यात आले होते.
लॉकडाउननंतर सोमवारी पहिल्यांदाच तिरुमला तिरुपती देवस्थान उघडण्यात आलं. मंदिर सोमवारपासून तीन दिवस ‘ट्रायल’ म्हणून उघडण्यात आलं होतं. यादरम्यान व्यवस्थापनाच्या दृष्टीने काय करता येईल याची पाहणी केल्यानंतर 11 जूनला म्हणजे आजपासून मंदिर भक्तांसाठी उघडण्यात येणार आहे.

20 मार्चपासून भाविकांसाठी बंद असलेल्या तिरुपती मंदिरात सामान्यपणे दर महिन्याला रोख आणि हुंडीद्वारे सुमारे 200 कोटी रुपयांचे दान मिळत असते.
पहिले दोन दिवस मंदिरात जवळपास 12 हजार भक्तांनी दर्शन घेतले. ते सर्व टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकं होते, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच 11 तारखेच्या दर्शनाचे तिकीटे काही तासांमध्येच संपल्याची माहितीही प्रशासनाने दिली.

WebTittle: Read | So many donations to Tirupati temple after lockdown


संबंधित बातम्या

Saam TV Live