वाचा | 24 तासात रूग्णांची संख्या इतकी

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 23 जून 2020

भारतात एक लाखामागे ३०.०४ रुग्ण असून जगभरात हे प्रमाण सरासरी ११४.६७ म्हणजे तिपटीने जास्त आहेत. अमेरिकेत दर लाखामागे ६७१ रुग्ण आढळले. लाखामागे कमीत कमी करोना रुग्णांची संख्या ही केंद्र सरकारने केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचेच द्योतक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भारतात एक लाख लोकांमागे करोनाच्या रुग्णांची संख्या जगभरात सर्वात कमी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या करोनासंदर्भातील १५३ व्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई, दिल्लीसह करोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या शहरांमध्ये नमुना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. ७२३ सरकारी आणि २६२ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये चाचण्या केल्या जात असून गेल्या २४ तासांमध्ये दीड लाख चाचण्या घेण्यात आल्या.

भारतात एक लाखामागे ३०.०४ रुग्ण असून जगभरात हे प्रमाण सरासरी ११४.६७ म्हणजे तिपटीने जास्त आहेत. अमेरिकेत दर लाखामागे ६७१ रुग्ण आढळले. लाखामागे कमीत कमी करोना रुग्णांची संख्या ही केंद्र सरकारने केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचेच द्योतक आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
भारतात एक लाख लोकांमागे करोनाच्या रुग्णांची संख्या जगभरात सर्वात कमी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या करोनासंदर्भातील १५३ व्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२४ तासांत १४ हजार ९३३ नवे रुग्ण; बाधितांची संख्या साडेचार लाखांकडे
संग्रहित छायाचित्र
देशात गेल्या २४ तासांत करोनाचे १४ हजार ९३३ रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरातील करोना रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार २१५ वर पोहोचली.गेल्या २४ तासांत ३१२ करोनाबळींची नोंद झाली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १४ हजार ११ झाली आहे. आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार १९० रुग्ण बरे झाले. करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७७ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशभरात १ लाख ७८ हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

Saam TV Live