वाचा | आजचा सोन्या-चांदीचा भाव

वाचा | आजचा सोन्या-चांदीचा भाव

मुंबई : भारत आणि चीन यामध्ये लष्करी संघर्षाची स्थिती निर्माण झाल्यानंतर कमॉडिटी बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली आहे. त्यात जगभरात देशात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोव्हीड-१९ ने भारतात आतापर्यंत ३.५ लाख नागरिकांना बाधा केली आहे. देशातील करोना मृतांचा आकडा १० हजारांच्या नजिक पोहचला आहे.लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केलं आहे.


मागील काही दिवस कमॉडिटी बाजारात तेजीचे वातावरण होते. आर्थिक आघाड्यावर करोनाने घाव घातला आहे. त्यामुळे जागतिक विकासदर कोलमडणार आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याला प्राधान्य देण्यात येत आहे. जगभरातील बडे गोल्ड ईटीएफ आपल्याकडील सोन्याचा साठा वाढवत आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कायम आहे.सोने खरेदीमध्ये भारत हा जगातील मोठ्या ग्राहक देशांपैकी एक आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अंदाजानुसार भारतीयांकडे २२००० ते २५००० टन सोने आहे. त्यापैकी ६५ टक्के सोने हे ग्रामीण भारतात आहे. या अवाढव्य सोन्यापैकी केवळ १.२ टक्के सोने गहाण ठेवण्यात आले आहे.
पाच भारतीय कंपन्यांमध्ये चीनची मोठी गुंतवणूक२५६ रुपयांनी कमी झाला होता. चांदीच्या दरात देखील ४३२ रुपयांची घसरण झाली होती. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार बुधवारी मुंबई सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७३७७ रुपये होता. २३ कॅरेट स्टँडर्ड सोने ४७१८७ रुपये आणि २२ कॅरेटचा भाव ४३३९७ रुपये होता.

www.goodreturns.in या वेबसाइटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६०५० रुपये झाला आहे. त्यात ५० रुपयांची घट झाली. २४ कॅरेट सोने आज ४७०५० रुपये झाले आहे. चांदीचा दर प्रती किलो ४७६१० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६२०० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी ४७४१० रुपये आहे. कोलकात्यात आज सोने २२ कॅरेटसाठी ४६९२० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४८२१० रुपये आहे.  चेन्नईत २२ कॅरेटचा भाव ४५४७० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९६१० रुपये झाला आहे. दरम्यान मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोने ७६१ रुपयांनी तर चांदीचा भाव १३०८ रुपयांनी वाढला होता. जागतिक कमॉडिटी बाजारात सोने दर १७२५ डॉलर प्रती औंस आहे. चांदीचा भाव १७.४५ डॉलर प्रती औंस आहे.


WebTittle :: Read | Today's gold-silver price

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com