वाचा |आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

साम टीव्ही न्यूज
रविवार, 14 जून 2020

दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर हा ७५.७८ रुपये तर डिझेलचा दर ७४.०३ रुपये इतका झाला आहे.  

 

लॉकडाउनच्या काळात ८२ दिवस तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कुठलाच बदल केला नव्हता त्यामुळे आता या कंपन्यांनी सलग आठ दिवस इंधन दरवाढ केल्याचे सांगितले जात आहे. तेल कंपन्यांनी केलेल्या या इंधन दरवाढीमुळे देशभरात सर्वत्रच ही दरवाढ होत आहे. मात्र, विविध राज्यांप्रमाणे त्याच्या दरात फरक पडतो. कारण, संबंधित राज्यांतील पेट्रोलवरील स्थानिक कर किंवा व्हॅट किती आहे? त्यावर तो अवलंबून असतो.सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर अतिरिक्त अर्थसहाय्य वाढविण्यासाठी उत्पादन शुल्क वाढवल्यानंतर मार्चच्या मध्यातच इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते.

आज (दि.१४) पुन्हा इंधनाची दरवाढ झाली आहे, त्यामुळे पेट्रोल ०.६२ रुपयांनी तर डिझेल ०.६४ रुपयांनी वाढले आहे.मुंबईत पेट्रोलचा दर ८२.१० रुपये आणि डिझेलचा दर ७२.०३ रुपये इतका झाला आहे. सलग आठव्या दिवशी ही दरवाढ झाली आहे. यामुळे दिल्लीतील आजचा पेट्रोलचा दर हा ७५.७८ रुपये तर डिझेलचा दर ७४.०३ रुपये इतका झाला आहे.  

 

 

 

 

शनिवारी पेट्रोलच्या दरात ५९ पैशांनी वाढ झाली होती. तर डिझेलच्या दरात ५८ पैशांनी वाढ झाली होती. तेल कंपन्यांनी सलग सातव्या दिवशी किरकोळ दर समायोजित केले आणि दर पुनरावृत्तीचा ८२ दिवसांचा अवधी संपुष्टात आणला आहे.

नाशिक – पेट्रोल (८२.४९), डिझेल (७१.३५)
औरंगाबाद – पेट्रोल (८३.१८), डिझेल (७३.१२)
पुणे – पेट्रोल (८१.८६), डिझेल (७०.७३)
नागपूर – पेट्रोल (८२.६१), डिझेल (७२.५९)
दिल्ली – पेट्रोल (७५.१६), डिझेल (७३.३९)
मुंबई – पेट्रोल (८२.१०), डिझेल (७२.०३)
कोलकाता – पेट्रोल (७७.०५), डिझेल (६९.२३)
चेन्नई – पेट्रोल (७८.९९), डिझेल (७१.६४)


संबंधित बातम्या

Saam TV Live