वाचा | पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव 

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 18 जून 2020

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि पेट्रोल विक्रेत्यांची गेल्या महिन्यात बैठक पार पडली. यात जूनपासून दैनंदिन दर आढावा घेण्याचे मान्य करण्यात आले. केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेससह एक्साइज ड्युटी अनुक्रमे १० आणि १३ रुपये प्रति लिटर वाढवली, तर पेट्रोल-डिझेलवर रोड सेस ८ रुपये आणि अबकारी कर दोन व पाच रुपयांनी वाढवला आहे.देशातील पेट्रोल डिझेलचे भाव जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत.

 

मुंबई : टाळेबंदीने सरकारचा जीएसटी आणि इतर कर महसूल आटल्याने आता इंधन विक्रीतून जास्तीत जास्त कर वसूल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.सलग १२ दिवसात पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर सरासरी ६.५ ते ७ रुपयांनी वाढवले आहेत. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपन्यांनी मंगळवारी विमान इंधनाच्या दरात देखील १६ टक्के वाढ केली. यामुळे दिल्लीत जेट फ्युएल ३९०६९.८७ रुपये किलो लीटर झाले आहे. यामुळे विमान तिकिटाचे दर वाढण्याची शक्यता आहे.आज मुंबईत पेट्रोल ८४.६६ रुपये झाले. बुधवारी पेट्रोलचा भाव ८४. १५ रुपये झाला आहे. त्यात ५१ पैशांची वाढ झाली. आज डिझेलचा भाव प्रती लीटर ७४.९३ रुपये झाला आहे. बुधवारी तो ७४.३२ रुपये झाला.
पेट्रोलियम कंपन्यां आज गुरुवारी सलग १२ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून ७ जूनपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात येत आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि पेट्रोल विक्रेत्यांची गेल्या महिन्यात बैठक पार पडली. यात जूनपासून दैनंदिन दर आढावा घेण्याचे मान्य करण्यात आले. केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेससह एक्साइज ड्युटी अनुक्रमे १० आणि १३ रुपये प्रति लिटर वाढवली, तर पेट्रोल-डिझेलवर रोड सेस ८ रुपये आणि अबकारी कर दोन व पाच रुपयांनी वाढवला आहे.देशातील पेट्रोल डिझेलचे भाव जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्या इंधन दर निश्चित करत असतात.सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या महिनाभरात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल ४० डॉलरच्या पुढे आहेत.

दिल्लीत पेट्रोलचा दर ७७.८१ रुपये झाला आहे. आज त्यात ५३ पैशांची वाढ झाली. आजचा डिझेलचा भाव ७६.४३ रुपये झाला आहे. त्यात ६४ पैशांची वाढ झाली. कोलकात्यात पेट्रोलसाठी ७९.५९ रुपये भाव आहे. कोलकात्यात डिझेल ७१.९६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८१.३२ रुपयांवर गेले आहे. चेन्नईत डिझेलचा दर ७४.२३ रुपये झाला आहे. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल ३७.३८ डाॅलर आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live