वाचा | शिवसेनच्या वर्धापनदिनानिमित्त काय बोलणार मुख्यमंत्री?

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 19 जून 2020

महाराष्ट्राच्या विधानभवनावर पुन्हा एकदा भगवा फडकल्यानंतरचा पहिला वर्धापनदिन शिवसेना आज साजरा करत आहे. करोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापनदिन नेहमीच्या जोश, जल्लोषाविना होणार आहे. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या बदलललेल्या राजकीय भूमिकेबद्दल उद्धव ठाकरे बोलणार का?, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

मुंबई: शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त महाविकास आघाडीतील मित्र पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत शिवसेनेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेनं मागील ५३ वर्षात अनेक चढउतार पाहिले. शिवसेनेवर अनेक संकटे आली. निवडणुकांमध्ये पराभव झाले. नेते सोडून गेले. या धक्क्यांतून सावरत शिवसेनेनं थेट सत्तेपर्यंत मजल मारली आहे. शिवसेनेच्या वाढीसाठी खस्ता खाणाऱ्या शिवसैनिकांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे. त्यामुळंच उद्धव ठाकरे यांच्या भाषणाबद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. राजकीय आघाडीवर शिवसेनेची वाटचाल यापुढं कशी असेल हेही आजच्या भाषणातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या विधानभवनावर पुन्हा एकदा भगवा फडकल्यानंतरचा पहिला वर्धापनदिन शिवसेना आज साजरा करत आहे. करोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापनदिन नेहमीच्या जोश, जल्लोषाविना होणार आहे. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या बदलललेल्या राजकीय भूमिकेबद्दल उद्धव ठाकरे बोलणार का?, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

गेली सुमारे ५० वर्षे राजकीय विरोधक राहिलेल्या काँग्रेसशी शिवसेनेनं आघाडी केल्यानं शिवसेनेमध्ये सध्या उलटसुलट चर्चा आहे. शिवसेनेच्या विरोधकांकडून काही प्रमाणात भ्रमही निर्माण केले जात आहेत. या सगळ्यांवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता शिवसेनेचे नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांसोबत ठाकरे यांचा संवाद व्हावा यासाठी शाखा-शाखांवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
 
WebTittle: Read | What will the Chief Minister say on the occasion of Shiv Sena's anniversary?

संबंधित बातम्या

Saam TV Live