वाचा | पंतप्रधान मोदी आज काय बोलणार ?

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 30 जून 2020

लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही आता संपत आलाय. याच दरम्यान, आज सायंकाळी ४.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा नागरिकांना संबोधणार आहेत.

नवी दिल्ली : करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात २४ तारखेला सायंकाळी उशिरा पंतप्रधानांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. आज या लॉकडाऊनचा ९८ वा दिवस आहे. पंतप्रधान मोदी आज आपल्या भाषणातून आत्मनिर्भर भारत अभियानावर आणखी भर देणार का? देशात करोनाचे रुग्ण ५ लाखांवर गेले आहेत. यामुळे जनतेला करोनाच्या संसर्गाबाबत अधिक जागरूक करणार का? लॉकडाऊनमध्ये आणखी सूट मिळणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत.

लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही आता संपत आलाय. याच दरम्यान, आज सायंकाळी ४.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा नागरिकांना संबोधणार आहेत. त्यामुळे, आज पंतप्रधान काय घोषणा करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय.

WebTittle :: Read | What will Prime Minister Modi say today?


 

 

 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live