वाचा | कधी धावणार मुंबई लोकल

साम टीव्ही न्यूज
रविवार, 24 मे 2020

 सध्याच्या घडीला मुंबईतील करोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून, करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारला उपाययोजना हाती घ्याव्या लागणार आहेत.राज्यातील लॉकडाउनचा चौथा टप्पा संपुष्टात आल्यानंतर काय करायचे. मुंबईसह राज्यातील करोना रुग्णांची सद्यस्थिती व यासंदर्भात वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा अंदाज यासंदर्भातही चर्चा झाली. लॉकडाउन कसा शिथिल करता येईल, यावर बैठकीत बराच विचार झाला. येत्या ३१ मे लॉकडाउनचा कालावधी संपुष्टात येत आहे. आता लवकरच राज्य सरकारकडून नव्या सूचना जारी केल्या जाऊ शकतात.

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी मुंबईची लाइफलाइन असलेली रेल्वेची उपनगरी लोकल सेवा सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाल्याचे सांगण्यात येते. मुंबई, ठाणे, पुण्यासह नाशिक भागांतील स्थलांतरित श्रमिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांच्या संख्येनुसार श्रमिक रेल्वे गाड्यांची उपलब्धता होत नाही. यामुळे मुंबई लोकल आणि श्रमिक रेल्वेच्या आणखी सेवा याबाबत उभय नेते केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना विनंती करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 सध्याच्या घडीला मुंबईतील करोना रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा ओलांडला असून, करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारला उपाययोजना हाती घ्याव्या लागणार आहेत.राज्यातील लॉकडाउनचा चौथा टप्पा संपुष्टात आल्यानंतर काय करायचे. मुंबईसह राज्यातील करोना रुग्णांची सद्यस्थिती व यासंदर्भात वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा अंदाज यासंदर्भातही चर्चा झाली. लॉकडाउन कसा शिथिल करता येईल, यावर बैठकीत बराच विचार झाला. येत्या ३१ मे लॉकडाउनचा कालावधी संपुष्टात येत आहे. आता लवकरच राज्य सरकारकडून नव्या सूचना जारी केल्या जाऊ शकतात.

येत्या सोमवारपासून मुंबईतून देशातंर्गत प्रवासी हवाई सेवेबाबत राज्य सरकारच्या पातळीवर निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले.औद्योगिक क्षेत्रात मुंबईचा नावलौकिक जगात आहे. यामुळे अधिक काळ मुंबईतील व्यवहार बंद ठेवणे परवडणार नाही. सुरुवातीला अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकारी आणि नंतर टप्याटप्याने मुंबईकरांना उपनगरी लोकल सेवा उपलब्ध करून द्यावी लागेल, अशी या बैठकीत चर्चा झाली.  

संबंधित बातम्या

Saam TV Live