वाचा | ट्रम्प यांना बंकरमध्ये का लपवलं 

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 1 जून 2020

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉएडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सुरू झालेले आंदोलन आणखीच चिघळत आहे. अमेरिकेतील ३० शहरांमध्ये हिंसक आंदोलन झाले आहे. वर्णद्वेषी आंदोलनाची धग आता व्हाइट हाउसपर्यंतही पोहचली आहे. 

वॉशिंग्टन:राजधानी वॉशिंग्टनमध्ये रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. तर, व्हाइट हाउसजवळ सलग तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू राहिले. यावेळी आंदोलकांनी जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला.कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉएडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सुरू झालेले आंदोलन आणखीच चिघळत आहे. अमेरिकेतील ३० शहरांमध्ये हिंसक आंदोलन झाले आहे. वर्णद्वेषी आंदोलनाची धग आता व्हाइट हाउसपर्यंतही पोहचली आहे. 

रविवारीदेखील, व्हाउट हाउसजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो आंदोलकांनी सहभाग घेतला होता. रविवारच्या आंदोलनाच्या दरम्यान सीक्रेट सर्व्हिस एजेंट्सना दंगलविरोधी पथकाचा गणवेश घालावा लागला होता. या प्रकरणातील आरोपी असलेल्या चार पोलिसांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.व्हाइट हाउसजवळ आंदोलन करणाऱ्या एका गटाने कचऱ्याच्या डब्याला आग लावली. काही आंदोलकांनी पोलिसांसोबतही धक्काबुक्की केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून सिक्रेट सर्व्हिस एजेंट्सने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणास्तव बंकरमध्ये लपवले. त्यानंतर पोलिसांनी व्हाउट हाउसजवळील आंदोलकांना बळाचा वापर करून हटवले.

WebTittle :: Read | Why Trump hid in the bunker 

संबंधित बातम्या

Saam TV Live