आदित्यनाथ बदलणार हैद्राबादचं नाव..

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

हैदराबाद : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, शहरांची नावे बदलणारे मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू असे म्हटले आहे.

हैदराबाद : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, शहरांची नावे बदलणारे मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेल्या योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू असे म्हटले आहे.

तेलंगणामध्ये 7 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यापूर्वी भाजप, काँग्रेस, टीआरएस, टीडीपी आणि एमआयएमकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. भाजपने प्रचारात केंद्रीय मंत्र्यांसह भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनाही उतरविले आहे. योगी आदित्यनाथ यांनी नुकतैच अलाहाबाद आणि फैजाबादचे नाव बदलले होते. आता त्यांनी हैदराबादचे नाव बदलण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे.

आदित्यनाथ म्हणाले, की हैदराबादमधील नागरिकांना वाटत असेल की हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करावे, तर त्यांनी भाजपला मतदान करावे. भारतात भाजपने रामराज्य निर्माण करण्यात जबाबदारी घेतली असून, त्यासाठी तेलंगणामध्येही जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे.

Web Title:Ready to rename Hyderabad as Bhagyanagar, says Uttar Pradesh chief minister Yogi Adityanath

संबंधित बातम्या

Saam TV Live