काय सांगता...लुटमारीत चक्क खरे पोलिसही सहभागी?

The real police were involved in the robbery
The real police were involved in the robbery

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना पोलिस Police असल्याची बतावणी करून लुटण्याच्या घटना वाढल्या असतानाच यामध्ये आता खरे पोलिसही  सहभागी झाल्याची घटना घडली आहे. The real police were involved in the robbery

मुंबईतील  भायखळा Bhaykhala येथे एका सोने व्यापाऱ्याचे अडीच किलो सोने Gold लंपास करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये एका खऱ्या पोलिसाचा देखील समावेश आहे. कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या खलील शेख असे या पोलिसाचे नाव  आहे.

३१ मे रोजी शिवडीतील सोनेव्यापारी भरत जैन हे मित्र मिलेश कांबळे याच्यासोबत दुचाकीवरून येत होते, त्यावेळेस काही पोलिसांनी त्यांची दुचाकी अडवली.

वाहनाची कागदपत्रे दाखवण्यासाठी पोलिसांनी त्यांना विचारले. सोबतच तेव्हा या पोलिसांनी त्यांच्या बॅगेचीही झडती घेतली. या दरम्यान बॅगेमध्ये अडीच किलो सोने असल्याचे त्यांना आढळून आले, यामुळे याची पोलिस ठाण्यात नेऊन नोंद करावी लागेल, असे सांगून ते सोने घेऊन फरार झाले, पण ते पुन्हा परतलेच नाहीत.

 हे देखील पहा - 

सीसीटीव्ही CCTV कॅमेरांच्या फुटेजची पाहणी केली असता त्या दुचाकींचे नंबर मिळाले आहेत. या मिळालेल्या गाडीच्या नंबरवरून पोलिसांनी खलील शेख आणि त्याच्या साथीदारांना शिवडी आणि नायगाव Naygaon परिसरातून अटक केली. 

तर जैन यांचा मित्र मिलेश कांबळे याला भायखळा पोलिसांनी पकडले आहे. मिलेश कडून मिळालेल्या माहितीवरूनच हा सर्व कट रचण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

Edited By- Sanika Gade

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com