VIDEO | येवले चहाच्या रंगांचं बिंग फुटलं 

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे
गुरुवार, 23 जानेवारी 2020

 येवले चहा एकदा पिऊन तर पाहा..हे ब्रीद वाक्य घेऊन प्रत्येक शहरात पोहचलेला येवले चहा अडचणीत सापडलाय. याचं कारण म्हणजे येवले चहामध्ये भेसळ होतीय. एफडीनं केलेल्या कारवाईत ही भेसळ उघड झालीय. काही दिवसांपूर्वी एफडीएनं कारवाई कारवाई करत तपासणीसाठी येवले चहाचे नमुने ताब्यात घेतले होते. या नमुन्यांच्या तपासणीतून येवले चहाच्या रंगांचं बिंग फुटलंय. या चहामध्ये सिंथेटीक फूड कलर आढळून आलाय. ज्यावर बंदी आहे. 

यापूर्वी पुण्यातील कोंढवा भागातील कारखान्यात मेलानाईट हा पदार्थ आढळल्यानं येवलेवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कोंढव्यातील आऊटलेट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा येवले चहावर संक्रांत आलीय. 

 येवले चहा महाराष्ट्रात एक मोठा ब्रँन्ड झालाय.. संपूर्ण राज्यात येवले चहाच्या अनेक फ्रँचायजी आहेत. पण या प्रसिद्ध चहामध्ये भेसळ होत असल्याचं समोर आल्यामुळे चहाप्रेमींमध्ये नाराजी आहे. येवले चहाला पसंती देणाऱ्या ग्राहकांवर येवले चहा आता तपासून पाहा असं म्हणण्याची वेळ आलीय.

WebTittle :: REALITY OF YEWALE TEA  

संबंधित बातम्या

Saam TV Live