दिलासादायक! भारतीय कंपन्यांनी कोरोनावर 70 प्रकारच्या लस शोधून काढल्या...

साम टीव्ही
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

भारतीय मेडीकल कंपन्यांना कोरोनावर 70 प्रकारच्या लस शोधून काढल्या आहेत. आता त्यांचं परिक्षण लवकरच करुन कोरोना रुग्णांवर त्या वापरल्या जातील अशी शक्यता आहे. त्यामुळे थोडा का होईना दिलासा मिळालाय,

देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता 13 हजार 387 वर पोहचलीय.. तर 437 जणांचे कोरोनानं बळी घेतलेत. तर मागील 24 तासांत 1हजार 7 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालीय. मात्र असं असलं तरी दिलाशाची बाब म्हणजे 1 हजार 749 रुग्ण कोरोनावर मात करुन घरीही परतले आहेत. सध्या 11 हजार 201 जणांवर उपचार सुरु आहेत. आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिलीय. महाराष्ट्रात सर्वाधिक 3 हजार 205 रुग्ण आहेत. तर दिल्लीत 1 हजार 640 जणांना कोरोनाची लागण झालीय. इकडे मध्य प्रदेशात 1 हजार 120 रुग्ण आढळलेत. तर गुजरातमध्ये 871 रुग्णांची नोंद झालीय.

त्यामुळे यावर लस निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत. पण आता भारतीय कंपन्यांनी सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे. भारतातील ६ कंपन्यांनी कोरोनावर औषध शोधले आहे. त्याचा माणसांवर वापर करून परीक्षण करण्यात येतंय. वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविणे यातील एक पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचदृष्टीने औषध निर्मिती करण्याचे नियोजन आहे.

 

कोरोना व्हायरसवर प्रभावी म्हणून लस या कंपन्यांना बनविता आली तरीदेखील 2021 पूर्वी हे औषध मोठ्या प्रमाणावर तयार होण्याची शक्यता फारच कमी आहे. 

भारतातील या कंपन्यांनी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी जवळपास ७० प्रकारच्या लस शोधल्या आहेत. त्याची चाचणी सुरु असून, यातील तीन औषधे माणसांवरील परीक्षणाच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहेत. या लसींच्या यशस्वी चाचण्या झाल्यानंतर कोरोनापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.

या कंपन्या करताय निर्मीती

 

भारत बायोटेक, मिनवॅक्स, जॉयडस कॅडिला, सीरम इन्स्टिट्यूट, बायोलॉजिकल ई आणि इंडियन इम्युनोलॉजिकल या कंपन्या कोरोना व्हायरसवर औषधांची निर्मिती करत आहेत. यातील कॅडिला ही कंपनी दोन औषधांवर काम करत आहे. 

Web Title - Reassuring! Indian companies discover 70 types of medicines on Corona ...


संबंधित बातम्या

Saam TV Live