आता  बंडोबांना 'ईडी'ची भीती

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

मुंबई : भाजप- शिवसेनेची युती झाली असली तरीही अनेक मतदारसंघांत नाराजांनी युतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंडखोरांशी संपर्क करीत आहेत. काही बंडखोर "नॉट रिचेबल' झाल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांमार्फत योग्य तो "संदेश' मुख्यमंत्री देत आहेत. यामुळे विनाकारण कुठले प्रकरण बाहेर निघून "ईडी'सारख्या तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा मागे लागला तर काय, अशी शंका बंडखोरांच्या मनात दाटू लागल्याचे काही बंडखोरांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते. 

विधानसभा निवडणुकीत भाजप 164 जागा, तर शिवसेना 124 जागा लढवत आहे. घटक पक्षांना भाजपने स्वतःच्या ताब्यातील 14 जागा दिल्या आहेत, मात्र कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची सक्‍ती केली आहे. या ठिकाणीदेखील बंडखोरी झाली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अनेक ठिकाणी बंडखोर उभे राहिले आहेत. तसेच, शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवरदेखील बंडखोरी झाली आहे. मुंबईत अंधेरी, गोवंडी, वर्सोवा आदी ठिकाणी बंडखोरी झाली आहे. 

या बंडखोरांना मुख्यमंत्री स्वतः संपर्क करीत आहेत, त्यांना योग्य ती समज देत आहेत. विदर्भातील सध्या भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदाराला समज देताना त्याच्या मतदारसंघातील नगरपालिकेतील घडामोडींची आठवण करून देण्यात आली आहे. एका बंडखोराबाबत सहकारी बॅंकेतील त्याच्या प्रकरणाचा पाढा त्याच्या निकटवर्तीयाकडे वाचल्याचे सांगण्यात येते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत (ता. 7) आहे. 

Web Title: rebel candidates are Afraid of Enforcement Directorate

संबंधित बातम्या

Saam TV Live