आंबोलीत यावर्षी सर्वाधिक पाऊस

आंबोलीत यावर्षी सर्वाधिक पाऊस

आंबोली - सर्वाधिक पाऊस महाराष्ट्रातील आंबोली या ठिकाणी यावर्षी झाला आहे. येथे तब्बल ८५७५  मि. मी.एवढा पाऊस झाला आहे, अशी माहिती पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी दिली.    

आंबोलीत पावसाचा विक्रम यावर्षी झालाय. नैऋत्य मोसमी वाऱ्याबरोबर अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या सर्वाधिक उंच टेकडीवर आंबोलीत अडले जातात. त्यामुळे येथे पावसाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. या वर्षी साधारण २१ जून नंतर चांगला पाऊस झाला

- भाऊ ओगले, पर्जन्यमापक

आंबोलीतील यावर्षीचा पाऊस असा -

जून मध्ये ४० इंच असणारा पाऊस जुलै महिन्यात सुरवातीला थोडी विश्रांती घेतली होती. २९ जुलैनंतर मुसळधार पाऊस कोसळला. दहा दिवसात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. चार ऑगस्टला १७ इंच (४२५ मि.मी.) एवढी नोंद झाली. यावर्षी कमी वेळात जास्त पाऊस झाला. दर वर्षी येथे पावसाच्या चार महिन्यात सुमारे ३०० इंचापर्यंत पाऊस होतो, वीस वर्षापूर्वी ही आकडेवारी ४०० ते ४५० इतकी होती.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. तसेच वर्षा पर्यटनासाठी आणि येथील धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यातील गारवा, येथील धुके, मुसळधार पाऊस आणि धबधबे पाहण्यासाठी, धबधब्यांखाली डुंबण्यासाठी येथे देशभरातून पर्यटक येत असतात. पावसाळ्यातील सुट्टीच्या दिवशी तर हजारो पर्यटकांची मांदियाळी आंबोलीत असते. त्यामुळे पावसाळ्यातील मजा लुटण्यासाठीची आंबोलीची क्रेझ तरुणाईला भुरळ घालते आहे.    

आंबोली येथे यावर्षी ३४३ इंच (८५७५ मि. मी. ) इतका पाऊस झाला आहे. जगातील पाऊस सर्वात जास्त मेघालयातील मौसिनराम येथे पडतो. येथे ८ हजाराच्या वर पाऊस पडतो .मात्र 2 वर्षे हे प्रमाण खूप कमी झाले आहे. यावर्षी तेथे ६२१८ मि. मी. एवढा पाऊस झाला. त्याखालोखाल चेरापुंजी हे ठिकाण आहे.येथे साधारण ८ महिने पाऊस पडतो. यावर्षी तेथे ६१०० मिमी इतका पाऊस झाला. त्यानंतर महाराष्ट्रातील सातारा येथील महाबळेश्वरला ७२०० मि मी पावसाची नोद झाली आहे.  


Web Title: Record Break rains in Amboli this year
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com