कांद्याच्या दर रेकॉर्डब्रेक 

कांद्याच्या दर रेकॉर्डब्रेक 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) - केंद्र शासनाने परदेशातून कांदा आयातीचा घाट घालूनही दरातील तेजी थांबलेली नाही. कांद्याचे दर गेल्या तीन वर्षांतील रेकॉर्डब्रेक उंचीवर पोचले आहेत. गेल्या वीस दिवसांत दर हजार रुपये वधारून प्रतिक्विंटल तीन हजार ९०५ रुपयांपर्यंत पोचला. उन्हाळ कांद्याची घटलेली आवक व नवीन लाल कांदा बाजारात दाखल होण्यास दीड महिना अवधी असल्याने दर वधारले आहेत. किरकोळ विक्रीत तर कांदा ६० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोचला आहे.

गेल्या पंधरवड्यापासून कांद्याचा दर रोज नवी उंची गाठत आहे. केंद्राने ही दरवाढ रोखण्यासाठी कांदा आयातीचे हत्यार काढले. तरीही कांद्याच्या दराची बुलेट ट्रेन सुसाट धावत आहे. पिंपळगाव बाजार समितीत आज कांद्याची १२ हजार ७८० क्विंटल आवक झाली. सकाळच्या सत्रात कालच्या तुलनेत तीन रुपयांनी दरवाढ होऊन साडेतीन हजार रुपयांपर्यंत दर पोचले. दुपारच्या सत्रात कांदा अधिकच कडाडला. कमाल तीन हजार ९०५ प्रतिक्विंटलपर्यंत दर पोचले. सरासरी तीन हजार ५०० रुपये; तर किमान दोन हजार रुपये दर मिळाले. उच्चांकी दरामुळे कांदा खरेदी-विक्रीतून साडेचार कोटी रुपयांची उलाढाल पिंपळगाव बाजार समितीत झाली.

Web Title: Record breaks of onion prices
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com