रेल्वे आणि पोस्टात बंपर नोकर भरती, कोरोना संकटात तरूणांना रोजगाराची सुवर्णसंधी

साम टीव्ही
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020
  • रेल्वे आणि पोस्टात बंपर नोकर भरती
  • रेल्वेत 35 हजार 208 पदं भरणार
  • पोस्ट खात्यात 3000हून अधिक जागा भरणार
  • कोरोना संकटात तरूणांना रोजगाराची सुवर्णसंधी

बेरोजगारांसाठी आता एक दिलासादायक बातमी रेल्वे आणि पोस्ट खात्यात मोठी नोकरभरती होणारंय. रेल्वेत जवळपास 35 हजार 208 पदं भरली जाणार आहेत. तर पोस्ट खात्यात 3000 पदांवर बंपर भरती केली जाणारंय. त्यामुळे कोरोना संकटातही बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणारंय. आपण पाहिलंय मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेक उद्योग धंद्यांना मोठा फटका बसला. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. छोट्या व्यावसायिकांचंही मोठं नुकसान झालं. अशात रेल्वे आणि पोस्ट खात्यात नोकरभरती होणार असल्यानं काही अंशी का होईना बेरोजगार तरूणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

पाहूयात कशी असेल ही नोकर भरती...


संबंधित बातम्या

Saam TV Live