रेड, ऑरेंज, ग्रीनझोनचे निकष बाजूला सारले जाणार?

साम टीव्ही
शुक्रवार, 15 मे 2020

पावसाळा तोंडावर असल्याने विविध जिल्ह्यांमधील उद्योग- व्यवसाय सुरू करण्याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता रेड, ऑरेंज, ग्रीन झोनचा निकष बाजूला सारला जाण्याची शक्यताय.

जगासह देशाला कोरोनानं अक्षरश: हैराण करुन सोडलंय. महाराष्ट्रात कोरानोचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. अशातच लॉकडाऊनही वाढतंय. त्यामुळे याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसतोय. मात्र त्याव्यतिरिक्त दुसरा मार्गही नाही. 

राज्यात मागील 14 दिवसांत राज्यातील रुग्णसंख्या तब्बल 16 हजारांहून अधिक वाढली आहे. आता पावसाळा तोंडावर असल्याने विविध जिल्ह्यांमधील उद्योग- व्यवसाय सुरू करण्याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता रेड, ऑरेंज, ग्रीन झोनचा निकष बाजूला सारला जाण्याची शक्यताय.

दुसऱ्या आणि तिसऱ्या लॉकडाउनच्या काळात ज्या जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे किंवा घटली आहे, अशा जिल्ह्यांची माहिती घेण्यात आली आहे.. अशा काही जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात उद्योग सुरू करण्याचे नियोजन मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौथा लॉकडाऊन 15 दिवस वाढवावा, असा सूर बैठकीत निघाल्याचं कळतंय. याबाबतची घोषणा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय.

महाराष्ट्रात 1 हजार 61 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. या 1 हजार 61 पोलिसांपैकी 112 हे पोलिस अधिकारी आहेत. आतापर्यंत 174 पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून दुर्दैवानं आतापर्यंत राज्यात 9 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेसत्तावीस हजाराच्या वर आहे. मात्र त्यातले एक हजारपेक्षा जास्त हे पोलिस कर्मचारी असल्यानं ही एक चिंतेची बाब आहे.

Web Title -  Red, Orange, Greenzone criteria to be set aside?


संबंधित बातम्या

Saam TV Live