किशोरवयीन मुलांना कोरोनाचा धोका कमी, याच वयोगटात  केवळ 0.2 टक्के रुग्णांचा मृत्यू

साम टीव्ही
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020
  • किशोरवयीन मुलांना कोरोनाचा धोका कमी
  • 20 वर्षांखालील 10 टक्क्यांहून कमी व्यक्तींना कोरोना
  • याच वयोगटात  केवळ 0.2 टक्के रुग्णांचा मृत्यू

किशोरवयीन मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोना महामारीचा परिणाम किशोरवयीन मुलांवर फारच कमी होत असल्याचं, WHO ने म्हटलंय.

 WHO ने किशोरवयीन मुलांबाबत एक महत्त्वाची माहिती जगासमोर आणलेय. किशोर वयीन मुलांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण कमी असल्याचं WHO ने म्हटलंय. मुख्य म्हणजे या वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचे गभीर परिणाम होण्याचं प्रमाणही कमी दिसून आलंय. 

WHOचं संशोधन काय सांगतं?

वय वर्ष 1 ते 20 यादरम्यान कोरोना संसर्गाचं प्रमाण 10 टक्क्यांहूनही कमी आहे. तर याच वयोगटात जगभरात मृत्यूचा दर 0.2 टक्क्यांहूनही कमी आढळलाय. कोरोनाचे गंभीर परिणाम या वयोगटात आढळले नाहीत. मात्र तरीही कोरोनामुळे या वयोगटातील रुग्णाचा जीव जाऊ शकतो, ही बाब WHOने स्पष्ट केलेय.

किशोरवयीन मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी जरी ही दिलासा देणारी माहिती असली तरी, धोका कमी झालेला नाही, हेही उघड आहे.

लहान मुलं आणि किशोर वयातील मुलांमध्ये वेगळ्या प्रकारे कोरोना व्हायरसचा प्रभाव पाहायला मिळतोय, असं WHOचं म्हणणं आहे, शिवाय या मुलांकडून संसर्गाचा धोकाही आहेच. त्यामुळे वयोगट कुठलाही असो, सोशल डिस्टन्सिंगला पर्याय नाहीये. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live