आजपासून केंद्र सरकारच्या कोविन पोर्टल वर लसीकरणासाठी करता येणार नोंदणी ( पहा व्हिडिओ )

new rule for vaccination
new rule for vaccination

मुंबई : येत्या दोन दिवसात म्हणजेच 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरणासाठी सर्वांना आज 28 एप्रिलपासून आपल्या नावाची नोंद करता येणार आहे. ही नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने कोविन ॲप आणि cowin.gov.in ही वेबसाईट जनतेसाठी उपलब्ध करून दिले आहेत.  यासाठी सर्वांनी लवकरात लवकर नोंद करावी असे आवाहन सरकार करत आहे.  Registration for vaccination can be done on the central governments Cowin portal

लसीकरण Vaccinatation मोहीमेसाठी भारत सरकारनं को-विन (Co-WIN) नावाचा डिजीटल Digital प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा आणि लस घेणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना वापरता येतो आणि वापरण्यास सोयीस्कर देखील आहे.

मुंबईतील एकूण २२७ प्रभागात सुरु होणार प्रत्येकी १ कोविड लसीकरण केंद्र:

मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका Municipal Corporation मिळून कार्यरत असलेल्या ६३ लसीकरण केंद्रांवर ४५ वर्ष वयावरील व्यक्तिंचेच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी रुग्णालयातील Private Hospital लसीकरण केंद्रांवर १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नोंदणीकृत नागरिकांना लस मिळू शकणार आहे. असे आदेश दिनांक १ मे २०२१ पासून सुरु होणाऱ्या १८ वर्ष वयावरील नोंदणीकृत नागरिकांच्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी केले आहेत. लस साठ्याचा ओघ वाढताच दररोज १ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने साध्य करण्याचे ठरवले आहे. 

त्याबरोबरच गृहनिर्माण संस्था कॉर्पोरेट हाऊसेस Corporate House यांनी आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांसमवेत ‘टायअप’  करण्यास सरकारने सांगितले आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com