कोव्हिड सेंटरमध्ये रात्री नऊनंतर नातेवाईकांना प्रवेश बंद 

दिनेश पिसाट
बुधवार, 9 जून 2021

जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराने रुग्णालय प्रशासनाने कडक निर्बंध डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लावले आहेत.

रायगड : अलिबाग Alibag जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ विक्रमजीत पडोळे यांना रुग्णाच्या नातेवाईकाच्या मित्राने कोव्हिडं सेंटरमध्ये धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याची घटना 8 जून रोजी घडली होती. जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराने रुग्णालय प्रशासनाने कडक निर्बंध डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लावले आहेत. Relatives entry ban in the Covid Center after 9 pm

होंडा शोरूममधील पाण्याच्या टाकीत सापडला तरुणाचा मृतदेह !

कोव्हिडं सेंटरमध्ये  Covid Center रात्री नऊ  वाजता दरवाजे बंद केले जाणार आहेत. रुग्णाला बोलायचे असल्यास व्हाट्सऍप कॉल द्वारे नातेवाईक संपर्क करू शकतो.

हे देखील पहा -

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, एखादी घटना घडल्यास माझ्याशी संपर्क साधा, नागरिकांनी अशा घटना टाळून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. 

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live