संशयास्पद मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

भूषण अहिरे
मंगळवार, 20 एप्रिल 2021

सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहेरगाव परिसरातील विहिरीत तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विजय देसले या इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी विजय देसले यांच्या मारेकऱ्यांना ताब्यात घेऊन जोपर्यंत पोलीस प्रशासनातर्फे कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय मृताच्या नातेवाईकांतर्फे घेण्यात आला आहे.

 

धुळे -  सोनगीर पोलीस ठाण्याच्या police station हद्दीतील मेहेरगाव परिसरातील विहिरीत तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विजय देसले vijay desle या इसमाचा संशयास्पद मृतदेह dead body आढळून आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी विजय देसले यांच्या मारेकऱ्यांना ताब्यात घेऊन जोपर्यंत पोलीस प्रशासनातर्फे कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय मृताच्या नातेवाईकांतर्फे घेण्यात आला आहे. सध्या संशयित आरोपी Accused हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सोनगीर songir पोलीस करीत आहेत. Relatives refuse to take possession of suspicious bodies

विजय देसले शनिवारी घरातून बाहेर जाताना शेतात जात असल्याचे सांगून तो बाहेर गेला परंतु रात्री उशिरा तो घरी न परतल्यामुळे घरच्यांनी दुसऱ्या दिवशी सोनगीर पोलीस ठाण्यामध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली त्यानंतर तब्बल तीन दिवसांनंतर अखेर विजय देसले यांचा मृतदेह मेहेरगाव शिवारातील प्रवीण भामरे यांच्या विहिरीमध्ये संशयास्पद रित्या आढळून आला.

विजय देसले शनिवारी दिवसभर प्रवीण भामरे या संशयिता बरोबर दिवसभर असल्याचे नातेवाइकांना समजल्यानंतर नातेवाईकांनी विजय देसले यांचा खून झाला असल्याचा आरोप लावत हा खून संबंधित संशयित प्रवीण भामरे यांनीच केला असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.संशयित प्रवीण भामरे हा गेल्या तीन दिवसांपासून फरार असल्याने त्यावर अधिकच संशय बळावल्याने पोलीस प्रशासनातर्फे त्याचा शोध घेतला जात आहे. Relatives refuse to take possession of suspicious bodies

परंतु जोपर्यंत संशयित मारेकरी प्रवीण भामरे हा पोलिसांना सापडत नाही व जोपर्यंत त्यावर कायदेशीर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिला आहे. या घटने नंतर मेहेरगाव परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून ज्या विहिरी मध्ये विजय देसले यांचा मृतदेह आढळून आला आहे त्या ठिकाणी गावकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे बघावयास मिळाले.

Edited by - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live