धुळ्यात दुर्गम भागात रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा !

Relief to relatives as Ambulance are available in remote area of Dhule
Relief to relatives as Ambulance are available in remote area of Dhule

धुळे: साक्री Sakri तालुक्यातील दहिवेल या दुर्गम भागामध्ये कोरोना Corona बाधित रुग्णांना जिल्ह्याच्या इतर ठिकाणी उपचारासाठी ने आण करावी लागत होती. कारण या गावामध्ये आरोग्य केंद्रात Health Center उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णास जिल्ह्याच्या इतर ठिकाणी मोठ्या रुग्णालयांमध्ये पोहोचविण्यासाठी ॲम्बुलन्सच नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. Relief to relatives as Ambulance are available in remote area of Dhule

त्यामुळे दहिवेल येथील शिवसेनेचे पदाधिकारी अमोल सोनवणे Amol  Sonavane यांनी आरोग्य केंद्रास ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली  आहे. मृतदेहाची ने-आण करताना देखील नातेवाईकांना खाजगी वाहन धारकांच्या हातपाय पडायची वेळ येत होती.

हे देखील पहा -

 रुग्णांना ने आन करण्यासाठी दहिवेल गावातील ग्रामस्थांची चांगलीच कसरत होत होती. आणि नंतर अनेक विनवण्या करीत मृतदेह स्मशानभूमी पर्यंत आणावा लागत होता. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात देखील अशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राने बघितली होती. कारण रुग्णवाहिका नसल्यामुळे मृतदेहांचा खच एकाच रुग्णवाहिकेतून भरून नेला जात असल्याचं वास्तव समोर आले होते.

बीड Beed जिल्ह्याची पुनरावृत्ती दहिवेल परिसरात होऊ नये, यासाठी दहिवेल Dahivel येथील शिवसेनेचे Shivsena पदाधिकारी अमोल सोनवणे यांच्या स्वखर्चातून दहिवेल आरोग्य केंद्रास ॲम्बुलन्स Ambulance उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे आरोग्य विभागास व रुग्णांच्या नातेवाईकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com