VIDEO | कोरोनाकाळात नोकरी गमावलेल्यांसाठी दिलासा

साम टीव्ही
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020
  • कोरोना काळात नोकरी गेली?
  • नोकरी गमावलेल्यांसाठी दिलासा
  • ३ महिने अर्धा पगार मिळणार

कोरोनाकाळात ज्यांची नोकरी गेली आहे. त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. कारण नोकरी गमावलेल्यांना तीन महिने अर्धा पगार मिळणार आहे. पण सरसकट सगळ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे का? याबद्दलचं हे सविस्तर वृत्त पाहा.

कोरोना काळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. त्यापैकी लाखो कामगारांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिलाय. या कामगारांना बेरोजगारी भत्त्याच्या स्वरुपात पगाराच्या ५० टक्के रक्कम मिळणार आहे.. तीन महिन्यासाठी ही रक्कम देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे ईएसआयसी अंतर्गत पात्र विमाधारकांना शेवटच्या तीन महिन्यांच्या पगाराच्या सरासरी 50 टक्के रोख रक्कम तीन महिन्यांपर्यंत मिळेल” असं ईएसआयसीकडून सांगण्यात आलंय.

कुणाला मिळणार लाभ? 

  • मासिक 21,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणारे औद्योगिक कामगार ईएसआयसी योजनेच्या कक्षेत येतात
  • दरमहा त्यांच्या पगाराचा एक भाग वजा करुन ईएसआयसीकडे जमा केला जातो
  • 24 मार्च ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोकरी गमावलेल्या/गमावणाऱ्यांना याचा लाभ मिळेल
  • सुमारे 41 लाख लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे
  • व्हिओ ३- कोरोनाने भारताचीच नाही तर अवघ्या जगाची अर्थव्यवस्था पार खिळखिळी करुन टाकलेय. नोकरदारांना याचा फटका अधिक बसलाय. अशात काही लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे मिळू शकणारा दिलासा, आश्वस्थ करणारा आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live