खासदार भामरेंनी दिला धुळेवासियांना दिलासा...रेमिडेसिवीर इंजेक्शने दिली मिळवून

साम टीव्ही ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

धुळे जिल्ह्यासाठी भाजपचे खासदार डाॅ.सुभाष भामरे Dr. Subhash Bhamre यांनी पाच हजार रेमडिसिविर Remidesivir इंजेक्शनचा साठा मिळवून दिला आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी भामरे यांना याबाबत विनंती केली होती. त्यानुसार डाॅ. भामरे यांनी ही इंजेक्शन मिळवून दिली आहेत. ​

धुळे : धुळे जिल्ह्यासाठी भाजपचे खासदार डाॅ.सुभाष भामरे Dr. Subhash Bhamre यांनी पाच हजार रेमडिसिविर Remidesivir इंजेक्शनचा साठा मिळवून दिला आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी भामरे यांना याबाबत विनंती केली होती. त्यानुसार डाॅ. भामरे यांनी ही इंजेक्शन मिळवून दिली आहेत.  Relief to the victims of Corona in Dhule district

धुळे जिल्ह्यामध्ये कोरोना Corona चा प्रादुर्भाव वाढलेला बघावयास मिळत आहे. आणि अशातच उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिव्हीर Remdesivir इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा देखील जिल्ह्यामध्ये भासत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे देखील बघायला मिळाले आहे. Sanjay Yadhav यांनी सर्व स्तरावर प्रयत्न करून इंजेक्शनचा साठा मिळवण्याचा प्रयत्न केल आहे.

त्यानुसार खासदार भामरे यांनी हैदराबाद Hyderabad येथील हेट्रो कंपनीशी Hetro Company संपर्क साधला आणि ५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची विनंती केली होती.  ती हेट्रो कंपनीने मान्य केली. परंतु राज्य सरकारने दिवसाला प्राप्त रेमडेसिव्हिरच्या साठ्यामधून धुळे जिल्ह्याला तीन टक्के कोटा देण्याचा, तसेच वटहुकूमाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. Relief to the victims of Corona in Dhule district

त्यामुळे कंपनीने कबुल केलेल्या ५ हजारांच्या साठ्यातून जिल्ह्याला आज ५०० इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला आहे. तो जिल्हाधिकारी कार्यालयाने स्थापन केलेल्या समितीद्वारे शासकीय रुग्णालयांसह घोषित कोविड Covid सेंटरमधील रुग्णांसाठी वाटप होत असल्याचे, खासदार भामरे यांनी सांगितले आहे.

Edited By- Daigambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live