खंडेरायाच्या गाभाऱ्यात मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक सजावट

खंडेरायाच्या गाभाऱ्यात मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक सजावट
mandir

पुणे - अखंड महाराष्ट्राचं Maharashtra कुलदैवत जेजुरीच्या Jejuri खंडोबाच्या मंदिरात आज मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक सजावट  Attractive decoration करण्यात आली आहे. या मोगऱ्याच्या flowers सजावटीमुळे खंडेरायाचा गाभारा आणि मूर्तीच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडली आणि त्यातच मोगऱ्याच्या सुगंधाने परिसर दरवळून गेला. Attractive decoration of flowers in the temple of jejuri 

कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन Lockdown सुरू आहे. या लॉकडाऊन मध्ये मंदिरे देखील बंद आहेत मंदिरे जरी बंद असली तरी मंदिरात होणारे नित्य पूजाअर्चा आरती ही सुरूच असते.

हे देखील पहा -

प्रत्येक वर्षी वैशाख मासानिमित्त वसंत ऋतुमध्ये जेजुरीत मोगरा महोत्सव आणि चंदन उटी महापूजा आयोजीत करण्यात येत असते. याहीवर्षी मंदिरामध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला आज हा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पुणे येथील खंडोबा भक्त सुनील पडवळ यांच्या वतीने मोगर्‍याच्या माळा देण्यात आल्या होत्या. Attractive decoration of flowers in the temple of jejuri 

तर याची आकर्षक सजावट देवाचे पुजारी गणेश आगलावे यांनी केली. खंडेरायाच्या मंदिरामध्ये असे अनेक आरास केली जाते यावर्षी दोन वेळा भक्तांनी दिलेल्या द्राक्षाची आरास देखील खंडेरायाच्या गाभाऱ्यात करण्यात आली होती आणि आज खंडेरायाचा संपूर्ण गाभारा हा मोगऱ्याच्या फुलांनी सजवून आकर्षक अशी सजावट केली होती.

सध्या लॉकडाऊनचे दिवस असल्याने  भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने भाविकांना हिच सजावट पाहावयास मिळावी यासाठी मंदिरात केलेले मोगऱ्याच्या सजावटीचे फोटो हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.Attractive decoration of flowers in the temple of jejuri 

Edited By - Shivani Tichkule

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com