कुंडलीतील लग्न स्थानात रवि बसला असेल तर होतील अनेक फायदे

प्रत्येक ग्रहाच्या स्थानावरुन त्याची विशेष फले प्राप्त होतात.
Kundali first place, Horoscope
Kundali first place, Horoscopeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कुंडलीत प्रत्येक ग्रहाला विशिष्ट स्थान दिले आहे. प्रत्येक ग्रहाच्या स्थानावरुन त्याची विशेष फले प्राप्त होतात.

हे देखील पहा -

बारा ग्रहांनुसार कुंडलीत बारा स्थानाचे महत्त्व अधिक आहे. कोणत्या स्थानात कोणता ग्रह स्थित आहे त्यानुसार व्यक्तीच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो. कुंडलीत रविला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. रविला अनेक ग्रहांचा राजा मानला जाते. लग्न स्थानात रवि बसल्याने त्याचे आपल्या जीवनशैलीवर विशेष स्वरुपाचे फायदे होतात. सूर्य जसा तापट व तळपता असतो त्यानुसार माणसांचे वागणे व बोलणे असते. कुंडलीतील पहिल्या घरात रवि असल्यास आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव कसा पडतो हे जाणून घेऊया.

१. जातकाच्या लग्न (Marriage) स्थानात रवि स्थित असल्याने त्याचा स्वभाव स्पष्ट असेल. बोलणे मुद्देसुद असेल व उदार व्यक्तीमत्त्व असेल. यांची भांवडे अधिक भाग्यवान असतात.

Kundali first place, Horoscope
कुंडलीतील गुणमेलनातील षडाष्टकाचा अर्थ कसा समजेल

२. मुले शैक्षणिक (Education) क्षेत्रात चांगली कामगिरी करतात व प्रत्येक गोष्टींचे पालन करतात. तसेच धार्मिक कार्यात त्यांना अधिक रस असेल. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून तुमचे वर्तन योग्य असेल.

३. पहिल्या घरात रवि बसल्याने व्यक्तीला अधिक क्रोधित करतो. प्रत्येक गोष्टीत स्वत:चे मत लादण्याची सवय असते.

४. ही व्यक्ती आळशी असेल. कामे पुढे ढकलण्याची यांना सवय असेल. तसेच एखादे काम सुरू केल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत ते शांत बसत नाही. त्यांच्यात अधिक महत्त्वकांक्षा असते.

६. तसेच या व्यक्तीचे कपाळ तेजस्वी व आकर्षक असेल. पहिल्या स्थानात रवि असल्याने केसांच्या व डोळ्यांची समस्या उद्भवते.

७. आपल्या कार्यात किंवा कामाच्या क्षेत्रात यांचे वर्चस्व अधिक असते. कौंटुबिक सुख उत्तम मिळते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com