जेजुरीच्या खंडोबा मंदिरात हापूस आंब्याची आरास

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात हापूस आंब्याची आरास
jejuri mango aras

जेजुरी - अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे ही आंब्यांची आरास आंब्याच्या डहाळी सहित केल्याने मंदिराच्या सौंदर्यामध्ये अधिक भर पडला आहे. mango decoration in Khandoba temple of Jejuri

जेजुरी - ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीला प्रत्येक वर्षी मंदिरामध्ये Mandir आंब्याची Mango आरास केली जाते. याहीवर्षी आंब्याचा हंगाम सुरू असताना पुण्यातील Pune खंडोबा भक्त अक्षय केशव शिरसागर यांनी रत्नागिरी Ratnagiri येथून हापूस आंबा आणून खंडोबा  मंदिराच्या गाभार्‍यात आरास केली आहे. जेजुरी jejuri देवस्थानचे कर्मचारी पुजारी सेवक वर्ग यांनी आमराई प्रमाणे ही आरास तयार केली आहे. ही आंब्याची सजावट करीत असताना आंब्याच्या डहाळ्या लावून त्यामध्ये आंबे लावल्याने मंदिराचा गाभारा हिरवागार झाला असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

खंडोबा मंदिर मध्ये अनेक वेळा आरास केली जाते. यामध्ये दिवाळीमध्ये फराळाची आरास केली जाते. तर द्राक्षाची आरास देखील केली जाते. त्याच बरोबर मोगऱ्याच्या फुलांची देखील आरास खंडोबाच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये केली जाते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर च्या भाविकांच्या  दर्शनासाठी बंद असले तरी पूजाअर्चा नित्य नियम वेळे नुसार होत आहेत. ही आंब्यांची आरास केलेले व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये वायरल करून भाविकांना दर्शनाचा लाभ मिळणार मिळत आहे. mango decoration in Khandoba temple of Jejuri

हे देखील पहा -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने मंदिरे देखील गेल्या अनेक दिवसापासून बंद आहेत. मात्र आता कोरोनाची संख्या कमी होत असल्याने अनलॉक सुरू आहे. त्यातच आता मंदिरही शासनाने भाविकांना दर्शनासाठी खुले  करावेत अशी मागणी आता जोर धरू लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com