Pithori Amavasya 2022 : पिठोरी अमावस्या कधी असते? फायदेशीर ठरेल व्रत, जाणून घ्या त्याविषयी

पिठोरी अमावस्या कोणी करावी ? जाणून घ्या त्याविषयी
Pithori Amavasya 2022
Pithori Amavasya 2022Saam Tv

Pithori Amavasya 2022 : हिंदू धर्मानुसार प्रत्येक महिन्याला अमावस्या असते. त्या प्रत्येक अमावस्याचे वेगवेगळे महत्त्व आहे व त्यांना वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जाते.

श्रावण (Shravan) महिन्याच्या शेवटच्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हटले जाते. यंदा ही पिठोरी अमावस्या २७ ऑगस्ट २०२२ शनिवारी येत आहे.

या अमावस्येला पितृ तर्पण इत्यादी धार्मिक कार्यात कुशचा वापर केला जातो, म्हणून तिला कुश अमावस्या असेही म्हणतात. या अमावास्येला पितरांची पूजा केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते. याशिवाय या दिवशी दुर्गा देवीची पूजा करण्याची तरतूद आहे. या दिवशी महिला दुर्गा देवीची पूजा करतात आणि आपल्या पुत्रांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पिठोरी अमावस्या व्रताची पूजा पद्धती आणि महत्त्व जाणून घेऊया.

पूजा विधी -

Pooja Vidhi
Pooja VidhiCanva

पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी मिसळून स्नान करावे. स्नान केल्यानंतर घरातील मंदिरात (Temple) दिवा लावावा. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. पितरांसाठी नैवेद्य आणि दान करावे. भगवान विष्णू आणि महादेवाच्या पूजेसह दानधर्म करावा.

Pithori Amavasya 2022
Ganesh Chaturthi 2022 : यंदाच्या गणेश चतुर्थीला पूर्ण होतील प्रत्येक इच्छा, गणपतीला 'दहा' दिवस अर्पण करा या प्रिय वस्तू

पिठोरी अमावस्येचे महत्व -

धार्मिक मान्यतेनुसार, पिठोरी अमावस्येचे व्रत केल्याने निपुत्रिक मुलांना संततीचे रत्न प्राप्त होते. ज्या माता हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते.

या दिवशी देवी दुर्गासह ६४ देवींच्या मूर्ती पिठापासून बनवल्या जातात. या दिवशी महिला पिठापासून बनवलेल्या देवीची पूजा करतात आणि उपवास करतात.

पिठोरी अमावस्येला दान, तपश्चर्या आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे. स्नानानंतर पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते. असे केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते.

पंरतु, केवळ विवाहित महिलाच पिठोरी अमावस्येचे व्रत आणि पूजा करू शकतात अशी धार्मिक मान्यता आहे. अविवाहित मुलींनी या दिवशी व्रत करू नये.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com