Pitru Paksha 2022 : पितृपक्षात अन्नदान का केले जाते ? त्याला किती महत्त्व आहे ?

हा पंधरवडा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरु होऊन आश्विन महिन्याच्या अमावास्या पर्यंत असतो.
Pitru Paksh 2022
Pitru Paksh 2022 Saam TV

Pitru Paksh 2022 : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचा पंधरवडा हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. यंदा हा १० सप्टेंबरपासून सुरु झाला असून २५ सप्टेंबर पर्यंत चालेल. असे मानले जाते, या दिवसात आपले पूर्वज पृथ्वी तलावर येतात व आपल्या आशिर्वाद देतात. या दिवसात पितरांचे अनेक कार्य केले जाते.

या पंधरा दिवसात प्रत्येक जण आपल्या पूर्वजांचे कार्य हे त्यांच्या तिथीनुसार करतात. हा पंधरवडा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरु होऊन आश्विन महिन्याच्या अमावास्या पर्यंत असतो. शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षाच्या तिथीला ज्या व्यक्तीचा मृत्यू (Death) होतो, त्याचे श्राद्ध कर्म पितृ पक्षाच्याच तिथीला होते.

शास्त्रांमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला आपल्या पितरांच्या मृत्यूची तारीख माहित नसेल तर अशा स्थितीत अश्विन अमावस्येला या पितरांचे श्राद्ध करता येते.

Pitru Paksh 2022
Pitru Paksha 2022 : तुमच्या पूर्वजांचे नाव माहित नाही ? तर, या पध्दतीने पितृपक्षात व्हा त्यांना श्रध्दांजली

अनेक वेळा आपल्याला पितृपक्षाच्या या पंधरवड्यात अन्नदान करण्यास सांगितले जाते परंतु, अन्नदान का करावे याचे महत्त्व बहुतेक लोकांना माहित नाही जाणून घेऊया ते का केले जाते व त्याच्या अख्यायिकेबद्दल.

सर्वपित्री अमावास्या ही आपल्या पूर्वजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केली जाते. पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी राखून ठेवला आहे.

यामागे एक कथा सांगितली जाते. महाभारतातील कर्ण हा दानशूर होता. महाभारतात रणागंणावर लढताना कर्णाचा मृत्यू होतो, तेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात जातो. तिथे इंद्राने कर्णाला अन्न म्हणून सोने खाण्यास दिले. यावर कर्ण म्हणाला, मी भुकेने व्याकुळ असताना तुम्ही मला अन्नाऐवजी सोने खायला देताय. यावर इंद्रदेव म्हणाले, कर्णा आयुष्यभर गरज पडलेल्या प्रत्येकाला तू मदत केलीस, कधीही तुझ्या दारातून कोणी रिकाम्या हाताने गेले नाही; परंतु आयुष्यभर तू धनाचेच दान केलेस, पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थही तू कधी अन्नदान केले नाहीस, त्यामुळे मी तुलाही सोनेच देतो. या प्रसंगाने कर्णाला त्याची चुक लक्षात आली. त्याने अन्नदान करण्यासाठी वेळ मागितला.

Pitru Paksh 2022
Pitru Paksha 2022 : पितृपक्षात पिंडदान करायचे आहे ? तर भारतातील 'या' प्रसिध्द ठिकाणी करा, मिळेल पितरांना मोक्ष

यावर इंद्रदेवाने त्याला सांगितले की, सूर्य जेव्हा तूळ राशी सोडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल व पूर्णचंद्र दिसेल तेव्हा अन्नदान केल्यास फलदायी ठरेल. यासाठी इंद्रदेवाने कर्णाला पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर अन्नदान करण्यासाठी पाठवले. त्यामुळे कर्णासोबत त्याच्या पूर्वजांना मृत्यूनंतर गती मिळाली, यामुळेच सर्वपित्री अमावास्येचा पंधरवडा हा पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्नदानासाठी महत्त्वाचा आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com