Shravani Somwar : शेवटच्या श्रावणी सोमवारी भगवान शंकराला करा प्रसन्न, होतील सर्व मनोकामना पूर्ण

शेवटच्या श्रावणी सोमवारी शंकराला असे करा प्रसन्न
Shravani Somwar
Shravani SomwarSaam Tv

Shravani Somwar : हिंदू धर्मानुसार श्रावण महिन्याला अधिक महत्त्वाचे मानले जाते. या महिन्यात शंकराची विशेष पूजा व अर्चना केली जाते.

या महिन्यात सोमवारी शंकराला दूध, बेलपत्र, भांग व धतुरा याचा शिवलिंगावर अभिषेक केला जातो. काही लोक या दिवसात शंकराचे उपवास देखील करतात. या दिवसात शंकराची आराधना केल्यानंतर ते प्रसन्न होऊन शुभ फल देतात असे म्हटले जाते. तसेच त्यांच्या कृपेने घरात सुख-शांती व समृध्दी देखील नांदते. सोमवारी काही उपाय केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

आज शेवटचा श्रावणी सोमवारमुळे शंकराला प्रसन्न कसे कराल जाणून घ्या

१. सोमवारी मनापासून शिवाची पूजा करावी. या दिवशी शिवलिंगावर चंदन, अक्षता, दूध, धतुरा, गंगाजल, बेलपत्र यांची फुले अर्पण करा.

२. भगवान शंकराला सोमवारी तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा भोग अर्पण करावा. या दिवशी शिव चालीसा वाचून शिव आरतीही करावी. यामुळे घरात सुख-शांती राहते.

३. आज शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे जव ही शिवमूठ आहे. ही शिवमूठ शंकराच्या पिंडीला अर्पण करून मनोभावे पूजा करावी. तसेच बेलपत्र वाहून १०८ वेळा मंत्र म्हणावा.

Shravani Somwar
Shravan 2022 : श्रावणात शंकराची पूजा करताना या पदार्थाचा वापर करू नका, अन्यथा होईल मोठे नुकसान

४. मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रदोष कालची उपासना शुभ मानली जाते. प्रदोष काळात केलेल्या शिवपूजेने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करतात.

५. सोमवारी दान करणे देखील खूप महत्वाचे आहे. असे मानले जाते की, या दिवशी संध्याकाळी काळे तीळ आणि कच्चे तांदूळ दान केल्याने धन आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात. एवढेच नाही तर पितृदोषाचा प्रभावही कमी होतो.

६. या दिवशी दही, पांढरे वस्त्र, साखर (Sugar) आणि दूध (Milk) यांचे दान केल्याने शिव भक्ताला इच्छित वरदान देतो. सोमवारी शिवरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने सर्व आर्थिक समस्या दूर होतात.

७. चंद्रदोषाचा प्रभाव दूर करण्यासाठी सोमवारचा दिवसही खूप शुभ आहे. यासाठी सोमवारी चंदन लावावे व पांढरे वस्त्र परिधान करावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com