Lunar Eclipse : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 'या' 4 राशींसाठी शुभ ठरेल

८ नोव्हेंबरला होणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे.
Lunar Eclipse
Lunar EclipseSaam Tv

Lunar Eclipse : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण कार्तिक महिन्याच्या एकादशीला होणार आहे. ८ नोव्हेंबरला होणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी तूळ राशीमध्ये अनेक ग्रहांचा संयोग होणार आहे. अशा स्थितीत अनेक राशींसाठी त्रासदायक ठरेल. त्याच वेळी, अनेक राशींसाठी, चंद्रग्रहण आनंद आणणार आहे. जाणून घ्या चंद्रग्रहणामुळे कोणत्या चार राशींवर परिणाम होईल. (India)

Lunar Eclipse
Solar Eclipse 2022 : आज आहे वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण; जाणून घ्या, भारतात कधी व कोठे दिसेल

या राशींना चंद्रग्रहणाचा लाभ मिळेल

मिथुन -

मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप खास असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण आनंद देणार आहे. करिअरला उड्डाण मिळेल. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. याच्या आधारे तुम्हाला प्रमोशनही मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.

कर्क -

कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण फायदेशीर ठरेल. या राशीच्या लोकांना प्रवासाचे योग मिळत आहेत. त्यामुळे थांबलेले पैसे परत मिळतील. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

वृश्चिक -

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण आनंददायी ठरेल. बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा सुरु केले जाईल. अचानक धनलाभ होत आहे.

Lunar Eclipse
Solar Eclipse | पाहा वेगवेगळ्या ठिकाणावरील सूर्यग्रहणाची दृश्य

कुंभ -

कुंभ राशीच्या लोकांसाठीही चंद्रग्रहण फायदेशीर ठरेल. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांना धनप्राप्ती होईल. दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com