Shravan 2023 : श्रावणात देवाला ही फूल करा अर्पण, होतील अपूर्ण इच्छा पूर्ण

Pahila Shravan Somvar 2023: श्रावणात कोणती फूल देवाला अर्पण करावी ?
Shravan 2022
Shravan 2022 ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pahila Shravan Somvar 2023:

श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. श्रावणात आपण अनेक देवी देवतांची पूजा अर्चना मनोभावे करत असतो.

हे देखील पहा -

हिंदू धर्मानुसार श्रावण हा महिना अधिक पवित्र मानला जातो. या महिन्यापासून हिंदू धर्मातील अनेक सणांना सुरुवात होते. या महिन्यात शंकराला अनेक फुल व पान वाहिली जातात. तसेच शंकाराच्या पिंडीची विशेष पूजा करुन पिंडीला फुलांनी व पानांनी सजवली जाते. पूजा व फूल अर्पण केल्याने पुण्य लाभून पापांचा नाश होतो आणि आपल्याला त्याचे चांगले फळ ही मिळते. देवाला फुल अर्पण केल्याने आपल्या त्याची फळे कशी मिळतात हे जाणून घेऊया.

असे मानले जाते देवाला सोने (Gold)-चांदी अर्पण केल्यापेक्षा त्यांना सुगंधित फुल अर्पण केल्याने ते अधिक प्रसन्न होतात. व त्याचे फळ आपल्याला दुप्पट प्रमाणात मिळते.

देवाला फुल का अर्पण करावी ?

देवाला फूल अर्पण केल्याने ते प्रसन्न होऊन गरिबी दूर होण्यास मदत होते. धनाचा आपल्याला लाभ होतो. आपल्या संपत्ती वाढ होते. अनेक वाईट सकंटांचा सामना करण्यास मदत होते. आपली सहन शक्ती व ताकद वाढण्यास मदत होते. तसेच उत्तम आरोग्य देखील लाभते.

Shravan 2022
Shravaini Somwar 2023: 'या' मंत्रांचा जप केल्याने भोलेनाथ होणार प्रसन्न; प्रगतीचा मार्ग नक्कीच सापडणार

कोणत्या देवाला कोणती फुल अर्पण केल्यास आपल्या इच्छा पूर्ण होतील जाणून घ्या -

१. गणपतीला चुकूनही कधी तुळशी अर्पण करु नका. गणपतीला शमीपत्र व दुर्वा आपण अर्पण करु शकतो. तसेच जास्वंदीचे लाल फूल अर्पण केल्यास आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.

२. भगवान शंकराला (Lord shiva) आपण बेलपत्र व धतुरा हे फूल अतिशय प्रिय आहे. असे मानले जाते शंकराच्या पिंडीला धतुरा व बेलपत्राच्या पानांनी अभिषेक केल्यास ते प्रसन्न होतात. भगवान शंकराची आवडती फुले म्हणजे अगस्त्य, गुलाब, पाटला, मौलसिरी, शंखपुष्पी, नागचंपा, नागकेसर, जयंती, बेला, जपकुसुम, बंधुक, कणेर, निरगुंडी, हरसिंगार, आक, मदार, द्रोणपुष्पा, नीलकमल, कमळ, शमीची फुले आदी फुले शंकराला प्रिय आहेत. तसेच कुंद व केतकीची फुले भगवान शंकराला अर्पण करु नका.

३. भगवान विष्णू कमळाचे फूल अधिक आवडते कारण त्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो. त्यासाठी इतर अनेक फुलांपेक्षा त्यांना कमळ अधिक प्रिय आहे.

ही फुले अर्पण करुन आपण देवांची मनोभावे पूजा केल्यास देव- देवता आपल्यावर प्रसन्न होऊन आपली हवी ती इच्छा पूर्ण करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

Shravan 2022
Nag Panchami 2023 : नागपंचमीच्या दिवशी चपाती का बनवली जात नाही? जाणून घ्या कारणं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com