आषाढ महिन्यातली गुप्त नवरात्री कधी आहे ? जाणून घ्या दुर्गाष्टमीचे व्रत कसे करायचे?

गुप्त नवरात्रीचे व्रत कसे करावे ?
Gupt navratri, Durgashtami vart
Gupt navratri, Durgashtami vartब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : हिंदू धर्मानुसार आपल्या प्रत्येकाला नवरात्रीबद्दल माहित आहे परंतु, शास्त्रानुसार हिंदू धर्मात चारही नवरात्रीची पूजा केली जाते.

हे देखील पहा -

चार नवरात्रीचे दोन भागात विभाजन केले आहे. चैत्र नवरात्री व शारदीय नवरात्री तसेच माघ व आषाढ महिन्यात येणारी नवरात्री या चार नवरात्री व्रत वैकल्य करुन साजरा केली जाते. माघ व आषाढ महिन्यात येणारी नवरात्री ही गुप्त नवरात्री असते. यंदा येणारी आषाढ महिन्यातील दुर्गाष्टमी ही विशेष आहे. या दिवशी दुर्गा देवीच्या महागौरीचे पूजन केले जाते. यात दहा महाविद्यांची पूजा धार्मिक पध्दतीने केली जाते.

कोणत्या दिवशी दुर्गाष्टमी आहे -

पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथीला ६ जुलै रोजी सकाळी १० वाजून १८ मिनिटांनी दुर्गाष्टमी सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी ७ जुलै रोजी सकाळी ०९ वाजून ५८ मिनिटांनी संपेल. तसेच याचे व्रत (Fast) आपण ७ जुलै रोजी करावयाचे आहे.

Gupt navratri, Durgashtami vart
मेष राशी असणाऱ्या व्यक्तींचा मेषसोबत कसे असते नाते

पूजेचा मुहूर्त (Time) -

०७ जुलैला दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ३१ मिनिटे ते रात्री ११ वाजून ३१ मिनिटापर्यंत शिवयोग आहे. त्यानंतर सिध्दीयोग सुरू होईल. तसेच या दिवशी चित्रा नक्षत्र ८ जुलै ला पहाटे २ वाजून ४४ मिनिटापर्यंत आहे. हे दोन्ही योग आणि नक्षत्र शुभ कार्यासाठी शुभ मानले जातात. मासिक दुर्गाष्टमीच्या तिथीला रवि योग येत असून तो पहाटे ०८ जुलै रोजी पहाटे ०२ वाजून ४४ मिनिटे ते ५ वाजून ३३ मिनिटापर्यंत आहे. मासिक दुर्गाष्टमीचा शुभ मुहूर्त हा दुपारी १२ वाजून ३१ मिनिटे ते ०१ वाजून ३१ मिनिटापर्यंत आहे. या मुहूर्तावर आपण शुभ कार्य किंवा पूजा-अर्चना करू शकतो.

पूजा कशी करावी -

या दिवशी दूर्गा देवीची मनोभावे पूजा करावी. यंदा गुप्त नवरात्रीची महाष्टमीही आहे. त्यासाठी आपण महागौरीची पूजा करु शकतो. या दिवशी आपण दुर्गा चालीसा, दुर्गा सप्तशती, देवी भागवत पुराण कथा इत्यादींचे पठण करणे चांगले मानले जाते. या दिवशी दुर्गा देवीच्या मंत्रांचा जप करणे देखील उत्तम राहील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com